राज्यात आज उच्चांकी 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर, तर 265 जणांचा मृत्यू

राज्यात आज उच्चांकी 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर, तर 265 जणांचा मृत्यू

राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 60.68 टक्के आहे. 2 लाख 65 हजार 158 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

  • Share this:

मुंबई 31 जुलै: राज्यात आज पुन्हा एकदा विक्रमी 10 हजार 320 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 265 जणांचा करोना मुळे मृत्यू झाला. 7543 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 60.68 टक्के आहे. 2 लाख 65 हजार 158 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या तब्बल दीड लाख सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 355 कोरोणा पॉझिटिव्ह  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 19075 झाली आहे.

पुणे विभागातील  62 हजार 370 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 411 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 271 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 21  रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.31 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.68 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

केंद्रीय आरोग्यंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज कोविड-19 (Covid-19) वर असलेल्या मंत्रिगटाची (GoM) बैठक घेत आढावा घेतला. देशात दररोज रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. हाती आलेली आकडेवारी दिलासा देणारी आहे असंही त्यांनी सांगितलं. देशात आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. देशासाठी ही दिलासा देणारी गोष्ट असल्याची माहितीही त्यांनी दिली.

खरं की खोटं? तंबाखूपासून बनवली कोरोना लस; आता ह्युमन ट्रायलची तयारी

देशाचा रिकव्हरी रेट हा 64.5 टक्के असून पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे 33.27 टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.18 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं. देशातल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये केवळ 0.28 टक्के रुग्णच हे व्हेंटिलेटर्सवर आहेत.

देशात 1.61 रुग्णांना ICU ची गरज आहे. तर 2.32 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता. ही संख्या आटोक्यात राहावी असा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोरोना रुग्णांसाठी Good News, फक्त 0.28 टक्के पेशंटलाच व्हेंटिलेटर्सची गरज

देशातल्या राज्यांना आत्तापर्यंत 268.25 लाख N 95 मास्क, 120.40 लाख पीपीई किट आणि 1083.77 लाख HCQच्या गोळ्यांचा पुरवढा केल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 31, 2020, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading