मुंबई 10 नोव्हेंबर: राज्याला आता खऱ्या अर्थाने दिवाळीचे (Diwali) वेध लागले आहेत. दिवाळीला आता फक्त चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठा तुडूंब गर्दीने भरल्या आहेत. या गर्दीने चिंता वाढली असतानाच सध्या दररोजची आकडेवारी ही दिलासा वाढवणारी आहे. मंगळवारी 10 नोव्हेंबरला राज्यात तब्बल 10 हजार 769 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 15 लाख 88 हजार 091 एवढी झाली आहे. तर राज्याचा Recovery Rate 91.96वर गेला आहे.
दिवसभरात आज 3 हजार 791 रुग्णांची वाढ झाली. तर 46 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर 2.63 एवढा झाला आहे. राज्यातल्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्याही घटली असून 92 हजार 461 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनातून (Coronavirus) बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होणार नाही, असा गैरसमज झाला आहे. त्यांनाही अधिक सावधान राहण्याची गरज आहे. कोरोनाच्या धोकादायक आफ्टरइफेक्ट्सबद्दलही अधिकाधिक काळजी घेण्याचं आवाहन सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Adar punawala) यांनी केलं आहे.
पूनावाला यांनी ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट शेअर करीत ट्विट केलं आहे की, आता कोविड-19 च्या अधिक काळासाठी त्रास देण्याच्या प्रभावाबाबत आता स्पष्टपणे रिपोर्ट उपलब्ध आहेत.
काँग्रेसवर बोलण्यापेक्षा आपलं तोंड बंद ठेवा, निरुपम यांनी संजय राऊतांना फटकारलं
तुम्ही कोरोनातून बरे झालात म्हणजे तुमच्यावरील धोका टळला असं समजू नका. तुम्ही काही महिन्यात पुन्हा संक्रमित होऊ शकता. यासाठी कृपया काळजी घ्या. पूनावाला यांनी ब्लूमबर्गचा जो रिपोर्ट शेअर केला आहे, त्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना नंतर येणाऱ्या आरोग्याशी संबंधित त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे.
बरे झालेल्या अनेक रुग्णांना फुप्फुसं आणि ह्दयाचे आजार, लवकर दमायला होणं यांसारख्या अनेक स्वास्थाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच कारणाने सर्वच ठिकाणी पोस्ट-कोविड क्लिनिक्स सुरू झाले आहेत, जेथे पोस्ट-कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहे.