COVID-19: सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, वाचा 24 तासांमधले सर्व अपडेट्स

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लहान घरांमधील हवा घरात मोठ्या प्रमाणात फिरत राहते आणि मोठ्या घरांमध्ये हवेचा प्रवाह कायम असतो.

मुंबईत आज 970 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंतबाधितांची संख्या 1लाख 17 हजार 421 एवढी झाली आहे.

  • Share this:
मुंबई 3 ऑगस्ट: राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. आजही नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 10,221 जणांना डिस्चार्ज मिळाला तर 8 हजार 968 रुग्णांची भर पडली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.76 टक्के एवढे झाले आहे. 4 लाख 50 हजार 196 एवढी झाली आहे. आज राज्यात 266 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली असून राज्यातील मृत्युदर तीन पॉईंट बावन टक्के एवढा झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी घरी जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त आहे. राज्यात आजपर्यंत दोन लाख 87 हजार तीस रुग्ण बरे झाले. राज्यात आज पर्यंत 22 लाख 98 हजार 723 नमुन्यांपैकी 450 196 नमुने पॉझिटिव्ह आल्याचे आढळले आहे. राज्यात सध्या नऊ लाख 40 हजार 486 व्यक्ती घरात स्वतंत्र विलीनीकरण यात आहेत तर 37 हजार नऊ संस्थात्मक विलगीकरण यामध्ये उपचार घेत आहेत. राज्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण पुणे येथे 41 हजार 664 असून त्यानंतर बत्तीस हजार 191 ॲक्टिव रूग्ण ठाणे जिल्ह्यात आहेत मुंबई ई 20 हजार 528 ऍक्टिव्ह रुग्ण सध्या आहेत. मुंबईत आज  970 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंतबाधितांची संख्या 1लाख 17 हजार 421 एवढी झाली आहे. Covid ची लस आल्यानंतरही नाही बदलणार जग; कोरोनासोबतच जगावं लागणार आज 46 जणांचा मृत्यू जाला त्यामुळे आत्तापर्यंत मृत्यूपावलेल्यांची संख्या 6490 एवढी झालीय. आज 1790 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.  तर आतापर्यंत 90089 डिस्चार्ज मिळाला आहे. शहरात तर 20546 सक्रिय रुग्ण आहेत. 618 चाळी आणि झोपडपट्ट्या सील तर 5470 इमारती सील करण्यात आल्या आहेत. गेली 5 महिने मुंबईचं जनजीवन (Lockdown In Mumbai)विस्कळीत झालं आहे. अनलॉकच्या (Unlock) निर्णयाची अंमलबजावणी सरकारने सुरु केली असून मुंबईची सर्वच दुकाने आता सुरु होणार आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन लावल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे पहिल्यांदाच एवढे दिवस मुंबईत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. लवकर संपणार नाही कोरोना महासाथीचा धोका; WHO ने दिला इशारा लॉकडाऊन हटविल्यानंतरही सरकारने निवडक दुकानांनाच परवानगी दिली होती. आता मात्र सरसकट सगळ्याच दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आलीय. त्याचबरोबर दारूची विक्री करणाऱ्या दुकानांना काउंटरवर विक्री करण्यास परवानगीही देण्यात आली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: