मुंबई 27 जुलै: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून पहिल्यांदाच घटली आहे. राज्यात आज 8706 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 7924 नव्या रुग्णांची भर पडली. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 7924 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 227 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 383723 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 13883 जणांचा मृत्यू झाला. आज 8706 जणांना सुटी देण्यात आली आहे. मुंबईत आज 1021 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 110182 वर गेली आहे.
20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाखांवर जाऊ शकते, त्यापैकी 48 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात असा अंदाज पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. 31 जुलैपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 60 हजारांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यापैकी 27 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात. सध्याच्या रूग्णवाढीनुसार पुणे मनपाने हा अंदाज व्यक्त केला.
बाहेरून येणाऱ्या रूग्णांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने 20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखांचा टप्पा करू शकते पार करू शकतो असंही त्यांनी सांगितलं.
पुण्यात आत्तापर्यंत 40931 रॅपिड अँन्टीजेन टेस्ट, त्यापैकी 8363 पेशंट्स पॉझिटिव्ह निघाले. पुणे मनपा 1 लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार आहे.
बापरे! पुण्यात Covid-19 रुग्णांची संख्या जाऊ शकते 1 लाखांवर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका दिवसात जवळपास 49 हजार 931 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून कोरोनाग्रस्तांचा देशातील आकडा 14 लाखावर पोहोचला आहे. कोरोनामुळे 24 तासांत 708 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशातील मृतांचा आकडा 32,771वर पोहोचला आहे.
COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये
कोरोना विरुद्धची लढाई यशस्वीपणे पार करून आतापर्यंत 9 लाख 17 हजार 568 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 लाख 85 हजार 114 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात कोरोनाचा रिकव्हरि रेट 63.92 आहे. गेल्या 24 तासांत सर्वात जास्त 5 राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे.
24 तासात आंध्र प्रदेशात 7627, तमिळनाडू 6986, कर्नाटक 5199 आणि उत्तर प्रदेशात 3246 नवीन कोरोनाच्या केसेस मिळाल्या आहेत.