COVID-19: राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या साडेपाच लाखांच्या जवळ, दिवसभरात 344 जणांचा मृत्यू

COVID-19: राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या साडेपाच लाखांच्या जवळ, दिवसभरात 344 जणांचा मृत्यू

राज्याचा रिकव्हरी रेट हा 69.64 टक्के एवढा असून Active रुग्णांची संख्या ही 1,47,513वर गेली आहे.

  • Share this:

मुंबई 12 ऑगस्ट: राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या ही आता साडेपाच लाखांच्या जवळ पोहोचली आहे. आज दिवसभरात 12,712 नवे रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 48 हजार 313 एवढी झालीय. तर आज 13,408  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या नवे आढळणारे रुग्ण आणि डिस्चार्ज मिळाणारे रुग्ण यांची संख्या वाढलेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 344 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट हा 69.64 टक्के एवढा असून Active रुग्णांची संख्या ही 1,47,513वर गेली आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांमध्ये मुंबई आणि पुण्यातल्या रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात एका दिवसात 60 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहे. गेल्या 24 तासातही 60 हजार 963 रुग्ण सापडले. तर, आतापर्यंत 704 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख 29 हजार 639 झाली आहे.

चिंताजनक! कोविड-19 साथीत वाढले ब्रोकन हार्ट सिंड्रोमचे रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख पार झाली आहे. यात 6 लाख 43 हजार 948 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 46 हजार 91 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 39 हजार 599 रुग्ण निरोगीही झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 70% झाला आहे.

कोरोनाला हरवणं शक्य आहे हे 70% रुग्णांनी करून दाखवलं आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 70 टक्के झालं आहे. म्हणजे इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाविरोधातील लढा यशस्वीरित्या जिंकला आहे. एकाच दिवसात 56,110 रुग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

दरम्यान, जगातील सर्वात पहिली कोरोना लस तयार करणाऱ्या रशियाने (russia) आता आणखी एक खूशखबर दिली आहे. लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं आहे. दोन आठवड्यांत रशियन कोरोना लशीची  (russian corona vaccine) पहिली बॅच तयार होणार आहे. 20 पेक्षा अधिक देशांकडून रशियन लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर मिळाली आहे, अशी माहिती रशियाने दिली आहे.

रशियानंतर आता आणखी एका देशानं तयार केली Corona Vaccine, लवकरच करणार घोषणा

रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितलं, आरोग्य कर्मचाऱ्यांसह कुणालाही ही लस घेता येणार आहे. रशियाने यासाठी एक स्पेशल ट्रेसिंग अॅप तयार केलं आहे. या अॅपमार्फत लस घेणाऱ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवलं जाईल. त्यांच्यावर या लसीचा काय परिणाम होतो किंवा काही दुष्परिणाम तर होत नाही ना हे अॅपच्या माध्यमातून तपासलं जाईल. स्पुतनिक न्यूजचा हवाला देत लाइव्ह मिंटने हे वृत्त दिलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 12, 2020, 8:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading