मुंबईचे होणार का वांदे? विमानाचं तिकीट देऊनही मजुरांचा परतायला नकार

मुंबईचे होणार का वांदे? विमानाचं तिकीट देऊनही मजुरांचा परतायला नकार

मुंबईत लोकल अजुनही सर्वसामान्यांसाठी बंदच असल्याने वाहतुकीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कधीच न थांबणारी मुंबई आता थबकली आहे.

  • Share this:

मुंबई 26 जुलै: मायानगरी मुंबईचा (Mumbai) गाडा चालतो तो श्रमिकांच्या घामावर असं म्हटलं जातं. देशातल्या कानाकोपऱ्यातून कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येत असतो. इथे आल्यावर दोन वेळच्या जेवणाची चिंता नाही याची त्याला खात्री असते. त्यामुळे मुंबईत लाखोंच्या संख्येने कामगार, मजूर राहतात आणि त्यांच्याच भरवश्यावर इथले सगळेच उद्योग वाढले. मात्र कोरोना आणि Lockdownमुळे अशा लाखो मजुरांना मुंबई सोडून गावी परतावं लागलं (Lockdown Stories). आता विमानाचं तिकीट, आरोग्य सुविधा आणि इतर सोयी देऊनही ते परत येण्यास तयार नसल्याने मुंबईचे वांदे होणार का असा प्रश्न पडला आहे.

मुंबईत रिअल इस्टेट, हॉटेल, स्वच्छता, भाजी-फळं, स्ट्रिट फुड अशा सगळ्याच क्षेत्रात परप्रांतीय मजूर काम करतात. त्यांची संख्या ही काही लाखांमध्ये आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं, कामं बंद झाली त्यामुळे हे मजूर जीवाच्या भीतीने आपल्या गावी परत गेले आहेत.

आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही ते यायला तयार नाहीत. रिअल इस्टेट सारख्या बड्या उद्योगांनी त्यांना विमानाचं तिकिट, आरोग्याच्या सुविधा, राहण्याची सोय अशा सगळ्या गोष्टी देण्याचं मान्य केलं आहे. मात्र मजूर परत यायला तयार नसल्याने आता कामं कशी पुढं न्यायची असा प्रश्न उद्योगांना पडला आहे.

त्यातच मुंबईत लोकल अजुनही सर्वसामान्यांसाठी बंदच असल्याने वाहतुकीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कधीच न थांबणारी मुंबई आता थबकली असून येणाऱ्या महिन्यांमध्ये हा गाडा पुढे कसा न्यायला असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

पुजेसाठी आणलेली फळं खाल्ली म्हणून शिक्षा; लहानग्यांना रस्सीने बांधून केली मारहाण

31 जुलै रोजी अनलॉक-2 (Unlock 2.0) संपणार आहे, त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉक-3 बाबत सरकार सध्या विचार करत आहे. याअंतर्गत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सिनेमागृह सुरू केली जाऊ शकतात. सूचना प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाला एक पत्र पाठवले आहे, यात सिनेमागृह खुली करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

PPE सूट घालून पाहुण्यांना वाढलं जेवण, अनोख्या लग्न सोहळ्याचा VIDEO VIRAL

यापूर्वी माहिती प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी 50 टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. सुरुवातीला 25 टक्के जागा आणि नियमांचे काटेकोर पालन करून सिनेमा हॉल सुरू करावे, अशी मंत्रालयाची इच्छा आहे. एवढेच नाही तर अनलॉक -3 मधील सिनेमा हॉलसोबत जिम देखील उघडण्यात येण्यावर चर्चा सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि मेट्रो उघडण्याच्या दृष्टीने विचार केला गेला नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 26, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या