मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कर्जदारांच्या नावांवर परस्पर उचललं कोट्यवधींचं कर्ज, ‘कोरोना’ने केला सगळाच खेळ खल्लास!

कर्जदारांच्या नावांवर परस्पर उचललं कोट्यवधींचं कर्ज, ‘कोरोना’ने केला सगळाच खेळ खल्लास!

फायनान्स कंपनीच्या प्रमुखाने 39 लोकांना तब्बल 6 कोटींचा गंडा घातला आता हफ्ते फेडायचे कसे असा प्रश्न लोकांना पडला आहे.

फायनान्स कंपनीच्या प्रमुखाने 39 लोकांना तब्बल 6 कोटींचा गंडा घातला आता हफ्ते फेडायचे कसे असा प्रश्न लोकांना पडला आहे.

फायनान्स कंपनीच्या प्रमुखाने 39 लोकांना तब्बल 6 कोटींचा गंडा घातला आता हफ्ते फेडायचे कसे असा प्रश्न लोकांना पडला आहे.

कल्याण 7 नोव्हेंबर: कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे (Corona and lockdown) सगळ्यांच्याच जगण्याची दिशा बदलली आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, अनेकांचा रोजगार गेला. त्यामुळे प्रचंड आर्थिक ताण सगळ्यांनाच सहन करावा लागतोय. कल्याणमध्ये (Kalyan) एका फायनान्स कंपनीच्या प्रमुखाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्याने तब्बल 6 कोटींचा घोटाळा (Bank loan fraud case) केल्याचं पुढे आलं आहे. कल्याणमध्ये रोलिंग स्किम मल्टी फंडीगच्या नावाखाली प्रशांत कांबळी यांनी संकल्प फायनान्स कंपनी स्थापन केली होती. गरजूंना नामांकित बँकेतून कर्ज काढून देणं हे या कंपनीचं मुख्य काम होतं. या कंपनीचे प्रमुख प्रशांत कांबळी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर हप्ते भरण्यासाठी बँकाकडून कर्जदारांच्या पाठीमागे तगादा सुरु झाला. त्यानंतर हफ्त्यांची रक्कम ऐकून कर्जदारांचे डोळेच पांढरे झाले. आपल्या  नावावर परस्पर गरजेपेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज काढल्याची बाब उघड झाली. त्यानंतर फसवणूक झालेल्या कर्जदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सगळं प्रकरण बाहेर काढलं तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची रक्कम 6 कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्य सरकारशी मतभेद, पोलीस महासंचालक जयस्वाल महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार या प्रकरणात आरोपींची 3 कोटी 95 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं. कोट्यवधी रुपयांचा कर्ज पुरवठा करणारे विविध बँकेतील 15 अधिकारी आत्ता पोलिसांच्या रडावर आहेत. अक्षय माने यांना पाच लाख रुपयांची गरज असताना त्यांच्या नावावर प्रशांत कांबळी यांनी 45 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. माने यांच्या प्रमाणेच फसवणूक झालेले 39 लोक समोर आले आहेत. ज्यांच्या नावावर प्रशांत यांनी 6 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. पोलिसांनी या प्रकरणात हेमलता कांबळी,  सुप्रिया शेरेकर,  तन्मय देशमुख,  वृषाली पवार, अभिजीत गुरव, राहूल कोळगे आणि मितेश कांबळे या सात जणांना अटक केली आहे.
First published:

Tags: Kalyan, Police

पुढील बातम्या