COVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, दिवसभरात 405 जणांचा मृत्यू

COVID-19: तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, दिवसभरात 405 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णांची एकूणसंख्या 11 लाख 67 हजार 493 एवढी झाली आहे.

  • Share this:

मुंबई 18 सप्टेंबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ अजुनही कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात 21 हजार 656 नवे रुग्ण आढळून आले. तर 405 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 22 हजार 78 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली. नव्याने सापडलेल्या रुग्णापेक्षा बरे झालेले रुग्ण आज अधिक. बरे होण्याच्या रुग्णाची टक्केवारी 71. 47 टक्के एवढी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची एकूणसंख्या 11 लाख 67 हजार 493 एवढी झाली आहे.

दिवसभरात 434 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधित झालेल्या पोलिसांची एकूण संख्या ही 20,801 एवढी झाली आहे. राज्यभरात सध्या 3,883 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. 16,706 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 212 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार? याबाबत भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केला आहे. आपल्या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 2021 साल. हो पुढच्या वर्षीच कोरोनाच्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू.  2021 सालच्या मध्यापर्यंत कोरोनाचं संकट कमी होईल, आपण सामान्य परिस्थितीत येऊ, अशी शक्यता एम्सच्या (AIIMS) कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी व्यक्त केली आहे. एएनआयने याबाबत ट्विट केलं आहे.

भारतात येण्याआधीच रशियन लशीबाबत मोठी माहिती; दिसून आले SIDE EFFECT

डॉ. संजय राय म्हणाले, "भारतात कोरोना लशीचं दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. जर सर्वकाही नियोजनानुसार झालं, तर जगात तयार होत असलेल्या कोरोना लशींपैकी कोणतीही कोरोना लस पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होईल. पण लस आली किंवा नाही आली तरीदेखील पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सर्वकाही सामान्य होईल अशी शक्यता आहे. पण जोपर्यंत कोरोनाविरोधात प्रभावी लस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्क वापरणं, हातांची स्वच्छता असे प्रतिबंधात्मक उपाय आपण करायला हवेत"

दरम्यान 2021 मध्ये भारताची कोरोना लसही उपलब्ध होईल, अशी आशा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी राज्यसभेत त्यांनी ही माहिती दिली.

भारतात कोरोनाच्या संकटकाळात मेडिकल ऑक्सिजनाचा पुरवठा घटला, का जाणवतोय हा तुटवडा?

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, "जगभरात जसे कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न होत आहेत, तसंच भारतातही सुरू आहे. भारतातील तीन लशी क्लिनिकल ट्रायलच्या  वेगवेगळ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 18, 2020, 8:11 PM IST

ताज्या बातम्या