COVID-19: महिन्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त, तर 425 जणांचा मृत्यू

COVID-19: महिन्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त, तर 425 जणांचा मृत्यू

राज्यात आत्तापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 88 हजारांवर गेली आहे.

  • Share this:

मुंबई 18 सप्टेंबर: राज्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या जास्त असतांनाच शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. शनिवारी दिवसभरात 23 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर 21 हजार 907 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांमध्ये 425 जणांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 72.22 टक्के एवढं झालं आहे. तर मृत्यूचं प्रमाण हे 2.71 टक्के एवढं आहे.

राज्यात आत्तापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 88 हजारांवर गेली आहे. तर राज्यात 3 लाखांच्या जवळ Active रुग्ण आहेत.

दरम्यान,  कोरोनाला हरवणारी लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे, असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. तसेच दोन महिन्यांत कंपनी लसीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. कोविशिल्ड लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येत आहे. लसीच्या निर्मितीसाठी सीरम आणि ऑक्सपर्ड विद्यापीठात यापूर्वीच करार झाला आहे.

ठाणे, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यात अलर्ट, दमदार पावसाची शक्यता!

मिळालेली माहिती अशी की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसच्या 100 कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन (Bill and Melinda Gates Foundation) आणि गवी (Gavi) यांच्याशी करार केला आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला यांनी दिली आहे.

आदर्श पूनावाला यांनी सांगितलं की, या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. दोन महिन्यांत आम्ही या लसीची किंमत जाहीर करू. अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत (Oxford University) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना व्हायरस लस तयार करीत आहे, ज्याचे टेस्ट रिझल्ट चांगले आले आहेत.

सरकारचं पितळ उघडं! या आरोग्य योजनेचा केवळ 1 टक्का कोरोनारुग्णांना लाभ

आम्ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research - ICMR) यांच्यासमवेत भारतातील हजारो रुग्णांवर या लसीची चाचणी करणार आहोत. मला खात्री आहे की लशीची चाचणी यशस्वी होईल. यापूर्वी पूनावाला म्हणाले होते की, ऑगस्टच्या अखेरीस आम्ही मुंबई आणि पुण्यातील 5000 हजार लोकांवर या लसीची चाचणी घेऊ.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसच्या 100 कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन (Bill and Melinda Gates Foundation) आणि गवी (Gavi) यांच्याशी करार केला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 19, 2020, 8:29 PM IST

ताज्या बातम्या