मुंबई 07 ऑक्टोबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत घट होत आहे. मात्र मृत्यूची संख्या मात्र कमी झालेली नाही. दिवसभरात 355 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.64 एवढा झाला आहे. बुधवारीही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त होतं. दिवसभरात 16 हजार 715 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर 14 हजार 578 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आत्तापर्यंत राज्यात 11 लाख 96 हजार 441 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) हे 80.81 टक्के एवढं झालं आहे.
देशात महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा सर्वात जास्त प्रकोप आहे. आणि महाराष्ट्रात मुंबई हा कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट आहे. कोरोनाविरुद्ध बीएमसीची सर्व हॉस्पिटल्स निकराची झुंज देत आहेत. मात्र में बृहन्मुंबई महानगर पालिके (BMC)च्या अनेक हॉस्पिटल्समध्ये गेल्या दोन महिन्यापासून PPE किट्स आणि ग्लोजची तीव्र टंचाई असल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मास्क, पीपीई किट्स, ग्लोज आणि इतर साहित्याची खरेदी ही महापालिकेचा खरेदी विभाग करत असतो. मात्र या खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्याने खरेदी प्रक्रिया थंडावली आहे. पालिकेकडे असलेला स्टॉक संपण्याच्या बेतात असून खरेदी केव्हा होणार असा आता प्रश्न विचारला जात आहे.
कसं सुरू आहे कोरोना लशीचं ट्रायल; जगात सर्वात पुढे कोणती लस? पाहा एका क्लिकवर
पालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये दर आठवड्याला 1 लाख 25 हजार पीपीई किट्स लागतात. रुग्णांची संख्या वाढत असल्याने या सुरक्षा साधनांचा सातत्याने पुरवढा होणे आवश्यक आहे.
Corona काळातही तापसीने घेतला ब्रेक; मालदीव व्हेकेशनचे PHOTO VIRAL
दरम्यान, कोरोना लशींच्या स्पर्धेत अमेरिका आणि ब्रिटनमधील लस सर्वात पुढे आहेत. अमेरिकन औषध कंपनी फायझर आयएनसी आणि जर्मनीतील बायॉनटेक एसई या कंपन्या एकत्रित काम करत आहेत. अमेरिकेतील बायोटेक मॉडर्ना आयएनसी आणि ब्रिटनची अॅस्ट्राझेनका पीएलसी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांसोबत काम करत आहेत. या लशींमध्ये भारताचीही भागीदारी आहे.या लशींच्या चाचण्यांचे निष्कर्ष येत्या दोन महिन्यांत सर्वांसमोर येऊ शकतात. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीही या शर्यतीत फार दूर नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus