COVID-19 रुग्णांच्या मृत्यूने आज गाठला 300चा आकडा, एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूची नोंद

COVID-19 रुग्णांच्या मृत्यूने आज गाठला 300चा आकडा, एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूची नोंद

आज राज्यात 10 हजार 300 नवे रुग्ण आढळून आलेत तर आज 10 हजार 900 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई 7 ऑगस्ट: राज्यात आज दिवसभरात तब्बल 300 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसांमध्ये झालेली ही सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. तर आज राज्यात 10 हजार 300 नवे रुग्ण आढळून आलेत तर आज 10 हजार 900 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 4 लाख 90 हजार 262 एवढी झाली आहे.  1 लाख 45 हजार 582 रुग्ण Active आहेत. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 66.67 वर गेलं आहे.

दरम्यान, आता मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे वाढलं असून ते तब्बल 87 दिवसांवर गेलं आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. 10 जूनला हा रेट फक्त 25 एवढाच होता. मात्र महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा कालावधी वाढल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

महिनाभरातच हा रेट 25 वरून 87 एवढा झाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे. याचा अर्थ नवे रुग्ण कमी प्रमाणात निघत असल्यांही म्हटलं जातं. धाराविमध्ये सुरुवातीला जास्त रुग्ण होते. मात्र मिशन धारावी राबविल्यामुळे ते प्रमाण कमालीचं कमी झालं आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी चिंता दूर झाली आहे.

नाकारला डिस्चार्ज, नगरसेवकानं चक्क पीपीई किट घालून कोरोना रुग्णाला उचलून नेलं

आता मोठ्या सोसायट्यांमध्ये रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. तर अनेक नवे पॉकेट्स तयार होत असल्याने प्रशासनाचं सर्व लक्ष त्यावर केंद्रीत झालं आहे.

दरम्यान,  मुंबईत येणाऱ्या नागरिकासांठी मुंबई महानगर पालिकेने आता नवे आदेश काढले आहेत. मुंबईत येणाऱ्या स्थानिक नागरिकांना परत आल्यानंतर 14 दिवस घरातच राहावं लागणार आहे. मुंबई महानगर पालिकेने (BMC) हे नवे आदेश काढले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिकेने म्हटलं आहे.

मुंबईत येणाऱ्या सर्वांना आता 14 दिवस घरातच व्हावं लागेल क्वारंटाइन, BMCचे आदेश

ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार आणि धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी परतले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने या गाईड लाईन्स जाही केल्या आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 7, 2020, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading