राज्यात COVID रुग्णांच्या संख्येत सलग 20 दिवसांपासून घट कायम, दिवसभरात 125 जणांचा मृत्यू

 राज्यात COVID रुग्णांच्या संख्येत सलग 20 दिवसांपासून घट कायम, दिवसभरात 125 जणांचा मृत्यू

Maharashtra Covid Update राज्यात दिवसभरात 5 हजार 505 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 125 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.62 एवढा झाला आहे.

  • Share this:

मुंबई 04 नोव्हेंबर: राज्यात (Maharashtra Covid Update)गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कोरोना रुग्णांच्या (Covid patient) संख्येतही घसरण अजुनही कायम आहे. बुधवारी (04 नोव्हेंबर) 8 हजार 728 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 15 लाख 40 हजारांवर गेली आहे. राज्याचा Recovery Rate 90.68वर गेला आहे. तर राज्यात दिवसभरात 5 हजार 505 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 125 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.62 एवढा झाला आहे. राज्या सध्या 1 लाख 12 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई आणि पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. कोरोनाचा आलेख घसरत असला हे दिलासादायक असलं तरी बिनधास्त होऊन चालणार नाही. मास्कचा सक्तीने वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या 3 गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं तर कोरोना दूर राहू शकतो. यात हलगर्जीपणा झाला तर दुसरी लाट येऊ शकते असा इशाराही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

भारतात कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) एकूण रुग्णांमध्ये 17 वर्षांपेक्षा कमी वयाचे फक्त 9 टक्के रुग्ण आहेत. कोरोनाव्हायरसचा धोका लहान मुलांना कमी असल्याचा सांगितला जातो आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचं संक्रमण कमी असलं तरी त्यांच्यामुळे कोरोना पसरत आहे. ते कोरोनाचे स्प्रेडर्स असू शकतात, असं आयसीएमआरनं म्हटलं आहे.

बदलत्या CORONA लाही घाबरण्याची गरज नाही; प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी अशी लस तयार

मिझोराममधील कोरोनाग्रस्त मुलांची संख्या वाढली आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी लहान मुलांमधील कोरोना संक्रमणाबाबत माहिती दिली. मिझोराममधील आकडेवारी पाहता लहान मुलांमधील कोरोना संक्रमणाचं प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.

आपली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनापासून आपला किती बचाव करू शकते?

काही देशांमध्ये लहान मुलांंमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणं दिसत आहेत. हा कोरोनासंबंधी आजार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या कोरोनाग्रस्त मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत, त्यांच्यामध्ये अशी लक्षणं दिसून येत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. जगभरातील विविध भागामध्ये याचा संबंध कोरोनाशी लावण्यात आला आहे.  दरम्यान याबाबतही भार्गव यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 4, 2020, 8:45 PM IST

ताज्या बातम्या