मुंबई, 13 एप्रिल : मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टिक बंदीला विरोध करणाऱ्या उत्पादकांची मागणी फेटाळून लावलीये. तसंच प्लास्टिक उत्पादकांच्या सुचनांचा सरकारला विचार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्लास्टिक बंदिच्या विरोधात प्लास्टिक उत्पादकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावलीये.
यासोबतच सरकारला याचिकार्त्यांच्या सुचनांचा विचार करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती ती वाढवून तीन महिने करण्यात आलीये.
या तीन महिन्यात प्लास्टिक वापरावरुन कुणालाही दंड आकारण्यात येणार नाही. प्लास्टिक उत्पादकांना सरकारसोबत चर्चा करण्याचे निर्दैश देण्यात आले आहे. याचिकेची पुढील सुनावणी 8 जुनला करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai high court, Plastic ban