SRA प्रकरणी विश्वास पाटलांना दणका, गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

SRA प्रकरणी विश्वास पाटलांना दणका, गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

SRA चे तत्कालीन सीईओ विश्वास पाटील आणि त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांच्यासह दोन विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहे.

  • Share this:

27 जुलै : SRA योजनेमध्ये घालेल्या घोटाळ्याप्रकरणी प्रसिद्ध कादंबरीकार आणि SRA चे तत्कालीन सीईओ विश्वास पाटील आणि त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांच्यासह दोन विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहे.

झोपु योजनेअंतर्गत घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे एक तक्रार दाखल कऱण्यात आली होती. या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान कोर्टाने एसआरएचे माजी सीईओ

विश्वास पाटलांना दणका दिलाय. विश्वास पाटील  आणि त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे सत्र न्यायालयाने आदेश दिले आहे.

रामजी शाह आणि रशेस कनकिया या दोन विकासकांना मालाड येथील एका प्रकल्पात नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 04:58 PM IST

ताज्या बातम्या