काळाघोडा फेस्टिव्हलच्या आयोजनावरील स्थगिती कायम, उद्या सुनावणी

काळाघोडा फेस्टिव्हलच्या आयोजनावरील स्थगिती कायम, उद्या सुनावणी

चर्चगेट स्टेशनसमोरील क्रॉस मैदानातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनावर तुर्तास बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 05 फेब्रुवारी : दक्षिण मुंबईत होणाऱ्या काळाघोडा फेस्टिव्हलच्या आयोजनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली असून मुंबई हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. चर्चगेट स्टेशनसमोरील क्रॉस मैदानातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनावर तुर्तास बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

आयोजकांतर्फे राज्य सरकारला फेस्टिव्हल संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यामुळे उद्या या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात यावी अशी विनंती आयोजकांतर्फे कोर्टात करण्यात आली. ही विनंती कोर्टाने मान्य केली पण कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भातील बंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

काळाघोडा फेस्टिव्हलसाठी कोणतंही शुल्क न आकारता सार्वजनिक जागेवर कार्यक्रमाची परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारवर हायकोर्टानं ताशेरे ओढले आहेत. हायकोर्टाच्या दणक्यामुळे जगविख्यात तबलावादक झाकीर हुसैन यांचा गेल्या शनिवारी असणारा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर आली.

या वर्षी ३ ते ११ फेब्रुवारीपर्यंत दक्षिण मुंबईत काळाघोडा फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. काळाघोडा परिसर शांतता क्षेत्र जाहीर करण्यात आल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चगेट स्टेशन समोरील क्राॅस मैदानात या फेस्टिव्हलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. मात्र हा कार्यक्रम आयोजित करत असताना कोणतंही शुल्क न घेतल्याबद्दल हायकोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

First published: February 5, 2018, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading