ठाणे, 12 डिसेंबर: ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे एका दाम्पत्यानं आपल्या पोटच्या लेकीचा दीड लाखांत सौदा (Baby girl deal in 1.5 lakh ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी दाम्पत्य त्यांच्या नवजात मुलीची विक्री करणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, ठाणे पोलिसांनी सापळा रचून आरोपींचा डाव उधळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली (6 arrested) आहे. तसेच विक्रीसाठी आणलेल्या 3 ते 4 दिवसांच्या मुलीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्याला आधीपासून तीन मुली आहेत. चौथ्या वेळी त्यांना मुलगा हवा होता. पण त्यांना मुलगीच झाली. त्यामुळे त्यांनी चौथ्या नवजात मुलीची विक्री करण्यासाठी चाचपणी केली. त्यासाठी त्यांनी एका दलाल महिलेशी संपर्क साधला. पण याची गुप्त माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. या गुप्त माहितीच्या अधारे पोलिसांनी बनावट खरेदीदार तयार केला आणि बालिकेची विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला.
हेही वाचा-VIDEO: कोल्हापुरात गव्याचा धुमाकूळ; पोटात शिंग खूपसल्याने तरुणाचा दुर्दैवी अंत
यानंतर नवजात बालिकेचे आई वडील आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेशी बातचित करून चिमुकलीचा दीड लाखात सौदा ठरवला. सौदा ठरल्यानंतर पोलिसांनी संबंधित दाम्पत्याला मुलीला घेऊन ठाण्यातील कॅसल मिलनाका परिसरातील स्वागत हॉटेलात बोलावलं. संबंधित दाम्पत्य आपले दोन नातेवाईक आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला घेऊन याठिकाणी आले. आरोपी दाम्पत्याने बनावट खरेदीदाराकडून दीड लाखाची रक्कम स्वीकारताच, आधीच सापळा रचून बसलेल्या पोलीस पथकाने आरोपींना रंगेहाथ पकडलं.
हेही वाचा-औरंगाबाद: पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य
याप्रकरणी पोलिसांनी नवजात मुलीच्या आई वडिलांसह, काही नातेवाईक आणि दलाल अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी नवजात बालिकेला आई वडीलांच्या ताब्यातून घेत, तिचा सांभाळ करण्यासाठी डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्टकडे पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Thane