घरासमोर लघुशंका करताना हटकले म्हणून दाम्पत्यावर खुनी हल्ला, पती ठार

आरोपी अमित श्रीवास्तव हा कनोजिया दाम्पत्याच्या घरासमोर लघुशंका करत होता.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 06:25 PM IST

घरासमोर लघुशंका करताना हटकले म्हणून दाम्पत्यावर खुनी हल्ला, पती ठार

मुंबई,3 नोव्हेंबर: घरासमोर लघुशंका करू नकोस, असे सांगणाऱ्या एका दाम्पत्यावर खुनी हल्ला झाला. त्यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मुंबईतील गोरेगाव भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. अमित श्रीवास्तव असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नंदलाल रामदेव कनोजिया (45) आणि उर्मिला नंदलाल कनोजिया हे दाम्पत्य गोरेगाव बाबासिंग चाळीत राहतात. आरोपी अमित श्रीवास्तव गुरुवारी (31 ऑक्टोबर) सकाळी त्यांच्या घरासमोर लघुशंका करत होता. कनोजिया दाम्पत्याने त्याला हटकले. यावरुन कनोजिया आणि आरोपीमध्ये बाचाबाची झाली. कनोजिया यांनी आरोपीविरूद्ध मालाड पोलिसांत तक्रार दिली. यामुळे संतापलेल्या आरोपी अमितने मित्राला बोलावले. दोघांनी कनोजिया दाम्पत्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात नंदलाल कनोजिया यांचा जागेवरच मृत्यू झाला तर उर्मिला या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी अमित श्रीवास्तव याला अटक केली असून त्याच्या विरोधात 302 आणि 307 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू..  

मुरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद तांबोळी यांचा मृतदेह खांदेश्वर रेल्वे स्थानाकाजवळच्या रेल्वे रुळाजवळ सापडला. पनवेल आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यान अज्ञात इसमाचा मृतदेह पडला असल्याच्या माहितीवरून रेल्वे पोलिसानी पाहणी केल्यानंतर ते पोलिस निरीक्षक विनोद तांबोळी असल्याचे स्पष्ट झाले. विनोद तांबोळी हे रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. आजारी असल्याचे कारण देत ते दोन दिवसाच्या रजेवर गेले होते. तांबोळी यांना रेल्वेची धडक बसल्याने त्यांना अपघात झाला असल्याचे रेल्वे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...