देश तुमच्यासोबत आहे, पण काही तरी बोला? संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

देश तुमच्यासोबत आहे, पण काही तरी बोला? संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

आपले 20 जवान शहीद झाले आहे. आपण असं काय केलं आहे? चीनचे किती जवान मारले गेले?

  • Share this:

मुंबई, 17 जून : भारत- चीन सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहे. या घटनेमुळे देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी एकापाठोपाठ दोन ट्वीट करून चीन प्रकरणावर बोलण्यास विनंती केली आहे. पंतप्रधान मोदी आपण शूर योद्धे आहात. तुमच्या नेतृत्त्वात चीनला धडा शिकवलाच पाहिजे, असं परखड मत राऊत यांनी व्यक्त केलं.

तसंच, चीनच्या या मुजोरीला भारत कधी सडेतोड उत्तर देणार आहे? बिना गोळीबार केल्या आपले 20 जवान शहीद झाले आहे. आपण असं काय केलं आहे? चीनचे किती जवान मारले गेले आहे ? असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.

भारत-चीन संघर्षावर अशी होती आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांची प्रतिक्रिया

तसंच, चीन हा आपल्याच भूमीवर पाय रोवून उभा आहे. त्याने खरंच घुसखोरी केली आहे का? पंतप्रधान मोदीजी, अशा या परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण, सत्य परिस्थिती काय आहे. काही तरी बोला, काही तरी सांगा. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी थेट मोदी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, त्याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. आता खूप झाले आहे. पंतप्रधान मोदी शांत का आहे. चीनच्या सीमेवर नेमकं काय झालं आहे. हे देशाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमतच कशी झाली? त्यांची हिंमत कशी झाली आपली जमीन घेण्याची? असा सवाल थेट राहुल गांधींनी मोदींना विचारला आहे.

काय घडलं गलवान खोऱ्यात?

चीननं पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात मोठा धोका दिला. या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली. भारत- चीन सीमेवर सोमवारी रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनचे किमान 43 सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

सोमवारी रात्री शांततापूर्ण चर्चेसाठी चीन सैनिकांना भेटण्यासाठी गेलेल्या भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांवर चीनच्या सैनिकांनी हल्ला केला. तब्बल तीन तास ही हिंसक झडप सुरू होती. चीनच्या सैनिकांनी पहिल्यांचा हल्ला करत दगडफेक केली आणि त्यानंतर काठीनं मारहाण करण्यास सुरुवात केली आणि हा वाद पेटला.

संपादन - सचिन साळवे

First published: June 17, 2020, 11:11 AM IST

ताज्या बातम्या