काय आहेत मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा?

काय आहेत मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा?

पाहू मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा

  • Share this:

पाहू मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा

 

- तब्बल १२ हजार कोटींची घट

-बेस्टसाठी कोणतीही भरीव तरतूद नाही

-कोस्टल रोडसाठी १ हजार कोटींची तरतूद, संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित रक्कम १२ हजार कोटी

-गोरेगांव मुलुंड लिंक रोडसाठी १३० कोटींची तरतूद

-रस्ते कामातही यंदाच्या बजेटमध्ये काटकसर

-रस्ते दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी १,०९५ कोटींची तरतूद, गेल्या वर्षी २८८६ कोटी इतकी तरतूद केली होती

-वाहनतळांची संख्या तीन पट वाढणार, ९२वरुन ही संख्या २७५करणार

-तीन ठिकाणांच्या भूमिगत वाहनतळांसाठी १ कोटींची तरतूद

-माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत महापालिका रुग्णालयांमध्ये अद्ययावत माहिती प्रणाली उभारणार

- माहुल आणि गजदरबांध पंपिंग स्टेशनसाठी ६५ कोटींची तरतूद

- शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाईन पोर्टल तयार करणार

-नालेसफाईसाठी ७४ कोटींची तरतूद

-मिठी नदीच्या किना-यावरील मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे हटवणे, सुशोभीकरण करणे यासाठी २५ कोटींची तरतूद

-कॅशलेस व्यवहार आणि एम गव्हर्नन्ससाठी महापालिकेच्या ११५ सेवा

-शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाईन पोर्टल तयार करणार

-मुलुंड, कांदिवली इथे उघड्या  नाल्यांवर अँक्रेलिक पत्रे टाकणार, त्यासाठी तरतूद ९ कोटी

-पर्जन्य जलवाहिन्यांसाठी ४७५ कोटींची तरतूद

-महापालिका रुग्णालयात ९ नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स सुरू केले जातील, यासाठी २१.५० कोटींची तरतूद

-महापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सची संख्या ४००पेक्षा जास्त वाढवण्यासाठी ३० कोटींची तरतूद

-महापालिकेच्या २८ प्रसूतिगृहांचा दर्जा वाढवण्यासाठी, आधुनिकीकरणासाठी ८.९० कोटींची तरतूद

- महापालिकेच्या दवाखान्यातून नि:शुल्क निदान सेवा उपलब्ध करुन देणार, १६.१५ कोटींची तरतूद

-गोरेगाव पूर्वमध्ये मल्टीस्पेशॅलिटी क्लिनिक सुरु करणार, १० लाखांची तरतूद

-हगणदारीमुक्त मुंबईसाठी  तरतूद, सामुदायिक शौचालये ७६ कोटी, घरगुती शौचालये ५.७० कोटी, सार्वजनिक शौचालये २.८८ कोटी

-सार्वजनिक शौचालयांमध्ये वीज, पाणी पुरवठ्यासाठी २६.३७ कोटीची तरतूद

- मुंबईभरात येत्या वर्षांत महिलांसाठी  केवळ ८ नवी शौचालये

- मुंबई शहराच्या साफसफाईसाठी खास यांत्रिक झाडू आणणार, २० कोटींची तरतूद

- सामूहिक शौचालयांध्ये १०० नवीन सँनिटरी नँपकीन व्हेंडींग मशिन आणि इन्सनरेटर ठेवणार. यासाठी १ कोटींची तरतूद

- कचऱ्यापासून वीजनिर्मीतीसाठी १५० कोटींची तरतूद

- मुंबईत ८४ मैदानांचा विकास केला जाणार, २६.८० कोटींची तरतूद

- मुंबईतल्या २० उद्यानं,मनोरंजन मैदानांच्या विकासासाठी ७० कोटींची तरतूद

-८ ठिकाणी नवे जलतरण तलाव, कांदिवलीत ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव यासाठी ४५ कोटींची तरतूद

-वांद्रे किल्ला क्षेत्रासाठी १ कोटींची तरतूद

-वांद्रे तलावाच्या सुशोभिकरणासाठी ३ कोटींची तरत

-उद्यान खात्यासाठी पुढील वर्षात २९१.८० कोटींची तरतूद

-राणी बागेच्या विकासासाठी ५०.२५ कोटींची तरतूद

-बेस्टमधून बीएमसीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

-जन्म मृत्यूचा दाखला आॅनलाईन मिळणार,हेल्थ बजेट- ३३११ कोटींचं 

- १०० नव्या सेमी इंग्रजी शाळा सुरू करणार,बालवाड्या मुख्य शाळांना जोडणार

-यावर्षी ५८२ परिचारिकांच्या जागा भरणार, ४०० वेंटीलेटर उपलब्ध करणार  

                     

 -वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  डिजिटल लायब्ररी आणि जीम सुरू करणार

First published: March 29, 2017, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading