मनसेचं 'ते' होर्डिंग पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी हटवलं

मनसेचं 'ते' होर्डिंग पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी हटवलं

पोलीस आणि महापालिकेनं शिवसेना भवनासमोर लावलेलं हे होर्डींग काढून टाकलं आहे.

  • Share this:

मुंबई,15 ऑक्टोबर: शिवसेना भवनासमोर मनसेनं लावलेलं होर्डिंग आता काढून टाकण्यात आलं आहे. सकाळपासून या होर्डिंगची चर्चा झाल्यानंतर पोलीस आणि महापालिकेनं शिवसेना भवनासमोर लावलेलं हे होर्डींग काढून टाकलं आहे.

काही दिवसांपूर्वी भांडूपची पोटनिवडणूक भाजपने जिंकली.त्यानंतर भाजप आणि शिवसेना आणि भाजपमधल्या जागांमधील फरक अत्यंत कमी झाला होता. पण आपलं वर्चस्व महापालिकेत राखण्यासाठी मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेने फोडले. त्यामुळे मनसेचा महानगरपालिकेत आता एकच नगरसेवक उरला आहे.

आता मनसेच्या सहा आमदारांच्या शिवसेना प्रवेशानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेत पोस्टरवॉरला सुरुवात झालीय. मनसेनं दादरला असणाऱ्या शिवसेना भवनाबाहेर एक पोस्टर लावून सेनेला लक्ष्य केलं होतं. ''मागितले असते तर सर्व सात नगरसेवक दिले असते. मात्र चोरून सहा नगरसेवक घेऊन गेले'' असा टोला मनसेनं हाणलाय. कठीण परिस्थिती येते तेव्हाच जिद्द जन्म घेते, असंही मनसेनेनं लावलेल्या होर्डींगमध्ये म्हटलं होतं. हे होर्डिंग लोकांच्या चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता हे होर्डिंग पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी हलवलं आहे. त्यामुळे मनसेचा सामान्य कार्यकर्ता आक्रमक झाला आहे.

आता यानंतर मनसे आणि शिवसेनेत काय राजकारण रंगतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 06:03 PM IST

ताज्या बातम्या