पावसामुळे चैत्यभूमीवर चिखल, पालिकेकडून भीमसैनिकांची निवाऱ्याची व्यवस्था

पावसामुळे चैत्यभूमीवर चिखल, पालिकेकडून भीमसैनिकांची निवाऱ्याची व्यवस्था

ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत कालपासूनच पाऊस पडतोय. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायींची मोठी गैरसोय झालीय.

  • Share this:

उदय जाधव, 05 डिसेंबर : ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत कालपासूनच पाऊस पडतोय. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायींची मोठी गैरसोय झालीय.दरवर्षीप्रमाणे लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत. तिथे त्यांची नेहमीच राहण्याची व्यवस्था केली जाते. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात चिखल झालाय. त्यामुळे देशभरातून आलेल्या आणि येणाऱ्या आंबेडकरी अनुयायींच्या रहाण्याची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने आणि काही सामाजिक संघटनांनी शाळा, काॅलेज, सामाजिक हाॅल उपलब्ध केलेत. जेणे करून मुंबई बाहेरून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायींची गैरसोय होणार नाही.

आंबेडकर अनुयायींसाठी राहण्याची सोय इथे केलीय -

* आंबेडकर भवन, वरळी.

* छबीलदास हाइस्कूल , दादर *

* वरळी BDD क्रमांक 1 व 2*

* आदर्श हाइस्कूल, वरली कोळीवाडा *

* वूलन मिल BMC स्कूल , माटुंगा *

* गोखले BMC  स्कूल , दादर *

* वरळी मायानगर जेतवन बुद्ध विहार *

* खेडगल्ली*

* धारावी लेबर कॅम्प *

* वरळी नाका BMC स्कूल *

* वरळी रमाई नगर*

* आंबेडकर शाळा, वरळी*

* सुभेदार रामजी नगर , वरळी *

* मनमाळा टंक BMC स्कूल, माटुंगा *

* अंकुर बुद्ध विहार , नायगाव *

* माटुंगा लेबर कॅम्प *

* दूधडेयरी वरळी *

* ललित कला भवन , नायगाव *

* ललित कला भवन , वरळी *

* वरळी BDD 106*

First published: December 5, 2017, 3:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading