Home /News /mumbai /

कोरोनाला घाबरू नका, या 10 गोष्टी करा म्हणजे तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल!

कोरोनाला घाबरू नका, या 10 गोष्टी करा म्हणजे तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल!

रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक कमी झाली तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी तयार राहा.

रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक कमी झाली तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी तयार राहा.

शारिरीक स्वास्थ टिकविण्यासाठी मानसिक स्वास्थ उत्तम राहणं आवश्यक आहे.

    मुंबई 22 मार्च : कोरोनाने सर्व जगभर थैमान घातलंय. जगातले 150 पेक्षा जास्त देश या व्हायरसने ग्रस्त झाले आहेत. सगळं जगच हादरून गेलं आहे. सगळ्यांना कोंडून घरातच राहावं लागत आहे. सगळ्यांनाच चिंतेने ग्रासलं आहे. पुढे काय होईल याची सगळ्यांना चिंता आहे. अशा वातावरणात आत्मविश्वास कमी होतो. शारिरीक स्वास्थ टिकविण्यासाठी मानसिक स्वास्थ उत्तम राहणं आवश्यक आहे. आत्मविश्वास कमी होऊ न देता राहणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यासाठी या 10 गोष्टी आवश्यक आहे. त्याचं पालन केलं तर मानसिक आरोग्य उत्तम राहिल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सगळ्यांना घरी राहावं लागत असल्याने कुटुंबासोबत आणि आपल्या प्रिय व्यक्तिंसोबत चांगला वेळ घालवा. या काळात तुमचे राहिलेले छंद जपता येऊ शकतात. त्यात मन रमवलं तर फायदा होऊ शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मित्रांशी कनेक्ट राहू शकता. त्याचा उत्तम वापर करता येईल. उत्तम पुस्तकांचं, साहित्याचं वाच करा. त्यामुळे मन रमेल आणि आत्मविश्वास वाढेल. कंपनी मालकाने जपली सामाजिक बांधिलकी, मार्चमध्येच कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार इंटरनेटवर सध्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. उत्तम ऑडिओ बुक्स, व्हिडीओ ब्लॉग्ज् आहेत आपल्या आवडीप्रमाणे त्याचा उपयोग करू शकता. दररोजच्या धावपळीमुळे तुमची झोप होत नसेल तर आता उत्तम झोप घ्या. झोप घेणं हाही तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. कामाचं कुठलंही नियोजन न करता. घरातल्या कुटुंबीयांशी मनसोक्त गप्पा मारल्यानेही तुमचा ताण हलका होऊ शकतो. घराची स्वच्छता करणं, पुस्तकं आवरून ठेवणं, फाईल्समधली कागदपत्र आवरणं अशी कामही करता येऊ शकतात. वाह! हा VIDEO पाहून घंटानाद-शंखनाद विसराल, बासरीवादन करत तरुणाची अनोखी मानवंदना या काळात सोशल मीडियावर व्यक्त होत तुम्ही तुमचं मत, भूमिका मांडू शकता. त्याचा इतरांनाही फायदा होईल. मात्र हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे  नियमित व्यायाम करा, योग, प्राणायाम आणि ध्यानधारनेमुळे नवी उर्जा मिळेल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या