धारावीमध्ये आणखी एक कोरोना मृत्यू; दिल्लीच्या मरकजशी होतं कनेक्शन

धारावीमध्ये आणखी एक कोरोना मृत्यू; दिल्लीच्या मरकजशी होतं कनेक्शन

मुंबईत धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. या भागात आतापर्यंतचा हा आठवा मृत्यू आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : दिल्लीतल्या मरकजशी संबंधित कोरोनाग्रस्त मुंबईतही सापडले होते. धारावीत राहणाऱ्या अशाच एका कोरोनाग्रस्ताचा बुधवारी मृत्यू झाला. धारावीत झालेला हा आठवा मृत्यू आहे. महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, हे 55 वर्षांचे गृहस्थ धारावीत डायमंड अपार्टमेंटमध्ये राहात होते. सायन रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. धारावीत आतापर्यंत 60 कोरोनारुग्ण आढळून आले आहेत.

एकेकाळी आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी उदयास आली. पण, आज धारावीचं रूप बदलून गेलं आहे. कोरोनाच्या तडाख्यात धारावी सापडल्यामुळे राज्य सरकारसह पालिका प्रशासनासाठी हे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. दाटीवाटीच्या या वस्तीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने तातडीने पावलं उचलली.

संबंधित - देशात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेली 11 हजारांवर, तर 392 जणांचा मृत्यू

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्णांची संख्याही एकट्या मुंबईत आढळली आहे.

मुंबईतील कोरोनाची आजची स्थिती

नवे रुग्ण--183

एकूण रुग्ण--1936

आज मृत्यू--2

एकूण मृत्यू--113

आज डिस्चार्ज--17

एकूण डिस्चार्ज--181

संशयितांसह रुग्णालयात आज भरती झालेले--261

आतापर्यंत भरती झालेले--5379

देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झालाय. 1344 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 118 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जगातल्या ज्या मोजक्या देशांनी उपाय योजना सुरू केली त्यात भारताचा समावेश होता असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.

अन्य बातम्या

तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद आणखी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर 'त्या' हजारोंच्या जमावाबाबत BMC ने केला मोठा खुलासा

First published: April 15, 2020, 7:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या