मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईतील झोपडपट्टीवासीयांकडे कोरोनाविरोधात कवचकुंडलं? उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण

मुंबईतील झोपडपट्टीवासीयांकडे कोरोनाविरोधात कवचकुंडलं? उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण

Coronavirus in Mumbai: कोरोना रुग्ण सापडण्यामध्ये एखादा पॅटर्न वेगवेगळ्या शहरात आढळून येत आहेत. मुंबईत झोपडट्टीपेक्षा इमारतीमध्ये अधिक कोरोना बाधित सापडत आहेत.

Coronavirus in Mumbai: कोरोना रुग्ण सापडण्यामध्ये एखादा पॅटर्न वेगवेगळ्या शहरात आढळून येत आहेत. मुंबईत झोपडट्टीपेक्षा इमारतीमध्ये अधिक कोरोना बाधित सापडत आहेत.

Coronavirus in Mumbai: कोरोना रुग्ण सापडण्यामध्ये एखादा पॅटर्न वेगवेगळ्या शहरात आढळून येत आहेत. मुंबईत झोपडट्टीपेक्षा इमारतीमध्ये अधिक कोरोना बाधित सापडत आहेत.

मुंबई, 17 मार्च: देशभरातील कोरोना आकडेवारीमध्ये महाराष्ट्र (Corona cases in Maharashtra) अव्वल असल्याने ही बाब चिंताजनक आहेत. राज्यातील महत्त्वाची शहरं कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहेत. मात्र कोरोना रुग्ण सापडण्यामध्ये एखादा पॅटर्न वेगवेगळ्या शहरात आढळून येत आहेत. मुंबईत झोपडट्टीपेक्षा (Corona Cases in Slum Area) इमारतीमध्ये अधिक कोरोना बाधित सापडत आहेत. झोपडपट्टीतील रहिवाशांवर 'इम्युनिटी'चं वरदान आहे का?  का इमारतीत अधिक रुग्ण सापडत आहेत? असे सवाल यानंतर उपस्थित होत आहेत. याचा शोध घेण्यासाठी न्युज18 लोकमतने मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या म्हणजेच कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण सापडणाऱ्या काही प्रभागांना भेट दिली आणि जाणून घेतली तिथली सत्य परिस्थिती.

मुलुंड हा मुंबईतील कोरोना ग्रस्त रुग्णांची सर्वाधिक वाढ असणारा प्रभाग आहे. या प्रभागात किती झोपडपट्ट्या आणि किती इमारतींमधील रहिवाशी हे बाधित झाले आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला असता असं लक्षात आलं की इथल्या इमारतीतील रहिवाशी सगळ्यात जास्त बाधित आहेत. बऱ्यापैकी उच्चभ्रू वस्तीत राहणार्‍या अनेक इमारतींमध्ये इमारतीतील रहिवासी कोरोनाग्रस्त आहेत.

यानंतर हॉटस्पॉटच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या असलेल्या अंधेरी पश्चिम या प्रभागात आमची टीम पोहोचली. तर इथेही हिच परिस्थिती पाहायला मिळाली. टोलेजंग इमारतींच्या संकुल असलेल्या ठिकाणी दहा रुग्ण सापडले होते. त्यानंतर एस उत्तर म्हणजे माटुंगा या प्रभागात पोहोचल्यावर लक्षात आलं की सायन कोळीवाडा सारखी मोठी झोपडपट्टी झाली असली तरी प्रत्यक्षात इथल्या मोठाल्या इमारती किंवा मग पारसी कॉलनी मध्ये रुग्णवाढीचा आकडा झोपडपट्ट्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.  मुंबईतल्या सगळ्याच प्रभागात अशा अनेक इमारती आहेत की ज्या सील करण्यात आल्या आहेत. किंवा मजले सील करणयात आले आहेत.

(हे वाचा-दुपारी 1 नंतर नाही मिळणार किराणा अन् भाजीपाला, मनपा आयुक्तांचे महत्त्वाचे आदेश)

टी प्रभाग म्हणजेच मुलुंडचे सहाय्यक आयुक्त असलेल्या किशोर गांधी यांचं म्हणणं आहे की  'जरी कोरोना हॉटस्पॉट च्या  यादीत  माझा प्रभाग पहिला असला तरी इमारतींमध्ये वाढणारे रुग्ण ही काय फक्त मुलुंडमधील परिस्थिती आहे असं नाही. तर हा ट्रेंड मुंबई भरात सगळीकडे बघायला मिळतो आहे. याचं कारण म्हणजे इमारतीमध्ये राहणारी बरीचशी मंडळी ही सुखवस्तू किंवा आर्थिक सधन असल्याने लॉकडाऊन काळात त्यांना तशी बाहेर पडायची गरज भासली नव्हती. त्यामुळे त्या काळात कोरोनाची बाधा होण्याच प्रमाणही इमारती मध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्यात कमी होतं. त्याउलट झोपडपट्ट्यांची परिस्थिती होती. आता लॉकडाऊन संपल्यानंतर लोक बाहेर फिरू लागले कामासाठी जाऊ लागले. प्रवास करू लागले आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य प्रवास वाढला त्यामुळे आधी फार 'प्रोटेक्टीव्ह' वातावरणात राहिल्याने आणि आता व्हायरसची थेट संबंध आल्याने त्यांना लागण होतेय आणि स्वाभाविक आहे.'

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार मुंबईतील 15 हजार सक्रिय रुग्णापैकी 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे इमारती मधील आहेत. म्हणजेच साडेतेराहजाराहूनही अधिक रुग्ण इमारतीतील आहेत तर अवघे दीड हजार रुग्ण हे झोपडपट्टीतील आहेत. मुंबईतील झोपडपट्टी भागातील रहिवाशांना हर्ड इंम्युनिटीच वरदान लाभलं आहे काय? हा प्रश्न पडतोच.

मुंबईत आतापर्यंत 2 ससेरो सर्व्हे झाले आहेत, जे आर उत्तर, एफ उत्तर आणि एम पश्चिम या प्रभागात करण्यात आले आहेत. ज्यात निदर्शनास आलं होतं की, झोपडपट्टी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये पहिल्या सर्वेक्षणात सरासरी सुमारे 57 टक्के आणि इमारतीमध्ये 16 % अँटीबॉडीज आढळून आल्या. तर दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान  निदर्शनास आले की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे 45 टक्के तर इमारतीमध्ये सुमारे 18 टक्के अँटीबॉडीज आढळून आल्या. त्यामुळे आता चाळी आणि झोपडपट्टीमधील रहिवाशांना लाभलेली ही इम्युनिटी किंवा अँटिबॉडीजची कवचकुंडल असू शकतात ज्यामुळे त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग कमी होतो आहे.

(हे वाचा-Explainer : Astrazeneca ची कोरोना लस देणं अनेक देशांनी का थांबवलं?)

मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्था पाहणाऱ्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणीच म्हणणं आहे की याला हर्ड इम्युनिटी म्हणता येणार नाही. हे खरं आहे की इमारतीच्या तुलनेत झोपडपट्टीतील रहिवाशांना आता कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे, पण झोपडपट्टी रहिवाशांना आधी संसर्ग झाला होता, त्याच्यामुळे त्यांच्यात अँटीबॉडीजही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पहिल्या आणि दुसर्‍या सर्वेनुसार 45 ते 56 टक्के इतकी वाढ झाल्याचे लक्षात आले आणि हे प्रमाण इमारतींच्या तुलनेत अधिक आहे.'

जाणकारांच्या मते इमारतीतील रहिवासी लॉकडाऊन मध्ये घरात सुरक्षित होते त्यामुळे त्यांच्यात संसर्गाच प्रमाण अल्प होत. पण आता मात्र आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याचं प्रमाण ही इमारतीतील राहिवाशाच्यात जास्त आहे. आणि झोपडपट्टी मध्ये आरटीपीसीआर चाचण्यांच प्रमाण पालिकेने कमी केलं. ज्या  ज्यामुळे हा ट्रेंड पाहायला मिळतोय की इमारतीत जास्त रुग्ण आहेत

डॉ. आशिष तिवारी यांच्या मते मुंबई महापालिकेने झोपडपट्ट्यांमध्ये फक्त अँटिजेन टेस्ट सुरू ठेवली ज्यांची विश्वासार्हता अत्यंत वाईट आहे.अवघ्या तीस टक्के इतकाच पॉझिटिव्हचं प्रमाण त्यातून लक्षात आलं आहे आणि आता टेस्टिंगचं जे प्रमाण आहे ते राज्यांच्या वेशीवर जास्त आहे. म्हणजे मुंबईत बाहेरच्या देशातून आणि  इतर राज्यातून मुंबईत येणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी होते आहे. त्यामुळे असा प्रवास करणारा बहुतांशी सगळा वर्ग हा इमारतीत राहणारा आहे. त्यांच्या चाचणीतून ते पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात येतं. पण मात्र मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये होणारी rt-pcr चाचणी  पालिकेने मागच्या काही दिवसांमध्ये थांबवली त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण दिसत नाहीत.'

(हे वाचा-माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधींचे कोरोनामुळे निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास)

मुंबईमध्ये सध्या 217 इमारती आणि 3170 सील मजल्यावर 6 लाखाहून अधिक मुंबईकर तर कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टीतील 2 लाख 30 हजार जण आहेत. मुंबईकरांच्यात हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे असं म्हणायचं असेल तर झोपडपट्टी आणि इमारती मिळून मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या 75 ते80 % लोकांच्यात जर करोना प्रति रोगप्रतिकारक शक्ती किंवा अँटिबॉडीज आढळलें तर त्याला तसं म्हणता येईल. मागच्या अनेक दिवसांत अनेक मुंबईकरांनी त्यांची करोना चाचणी केली आहे. त्याच रक्ताच्या नमुन्यांतून अँटिबॉडीज ची चाचणीही केली जातेय ज्याला सेरो सर्व्हे 3 म्हटलं जातंय. हा सेरो सर्व्हे मुंबईतील सगळ्या प्रभागासाठी असेल ज्यात आधीच्या सेरो सर्व्हेच्या तुलनेत दुप्पट म्हणजे जवळपास 10 हजार रक्ताचे विविध नमुने तपासले जाणारेत. जे मुंबईकरांच्या इम्युनिटीचा लेखाजोखा अधिक स्पष्टपणे दाखवू शकतील.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Covid19, Maharashtra