मुंबई, 27 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 135 वर पोहोचली आहे. परंतु, कोरोना हा बरा होतोय, अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच, आता राज्यात ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या '3 टी' सरकारचा जास्त भर असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवर आढावा घेऊन माहिती दिली.
'राज्यात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 135 वर पोहोचली आहे. पण, राज्यभरात 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमधून रुग्ण बरे होते आहे ही आशादायी बाब आहे', असंही राजेश टोपे म्हणाले.
'खासगी डॉक्टरांनी असंवेदनशील होऊ नये'
राज्यावर कोरोनाचं संकट आले आहे. अशा परिस्थितीत सरकारी डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून कर्तृव्य बजावत आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार,
राज्यातील खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद करून ठेवले आहे. रुग्णांची तपासणी करण्यास नकार दिला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा परिस्थितीत असंवेदनशील होऊ नका, आपले दवाखाने सुरू ठेवा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न सुरू आहे. जनतेनंही योग्य सहकार्य केलं पाहिजे. यापुढे राज्यात ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या '3 टी' वर जास्त भर दिला जाणार आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
हेही वाचा -कोरोनाशी लढा यशस्वी, कल्याणमधील 3 वर्षांच्या चिमुकलीनं केली महासंकटावर मात
तसंच सध्या राज्यात रक्तसंचय कमी झाला आहे. रक्त ही अशी गोष्ट आहे जी तयार करता येत नाही. त्यामुळे पुरेपूर काळजी घेऊन नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं.
'कोरोना सारख्या व्हायरसविरोधात जीवाची बाजी लावून डॉक्टर, कर्मचारी लढा देत आहे त्यांचं कौतुक आहे. एक परिवार म्हणून सरकार त्यांची पूर्ण काळजी घेत असून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देणार आणि प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार करत आहे', अशी माहितीही टोपे यांनी दिली.
त्याचबरोबर, शेती व्यवसाय सुरू राहिलाच पाहिजे, शेतीमाल बाजारपेठेत आला पाहिजे. प्रशासन योग्य ती मदत करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.