Home /News /mumbai /

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी केली केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी, म्हणाले...

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी केली केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी, म्हणाले...

देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे. देशभरातील व्यवहार ठप्प झाले आहे.

    मुंबई, 25 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे.  देशभरातील व्यवहार ठप्प झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मागणी केली आहे. शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी केंद्रीय अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी मदत मागितली आहे. 'कोरोना व्हायरस रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदियासह इतर भागातील शेतकऱ्यांना धान्य पुरवठा करण्यासाठी 4-6 आठवड्याची मुदत द्यावी, अशी विनंती पवार यांनी केली. दरम्यान,रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांनी आपल्या खासदार निधीतून बिहारसाठी 1 कोटी रूपये देण्याची घोषणा केली आहे.  पासवान यांनी पटना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मदत देत असल्याचं सांगितलं आहे. बिहारमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर उपाययोजना आणि नागरिकांची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या वस्तू या निधीतून घेण्यात याव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली. तसंच पासवान यांचा मुलगा चिराग यांनीही आपल्या पक्षातील  खासदारांना खासदार निधी देण्याची सूचना केली आहे. हेही वाचा - PM मोदींचं एक भाषण आणि जयंत पाटलांनी सांगितले 5 दुष्परिणाम, म्हणाले...  कोरोनाचा भारतात 11 वा बळी कोरोनामुळे भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारतात 11 बळी घेतला आहे. तामिळनाडूमधील राजाजी रुग्णालयात 54 वर्षांच्या व्यक्तीवर कोरोना व्हायरसचे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडूचे आरोग्य मंत्री सी विजयाभास्कर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या वर्षीय व्यक्तीला डायबेटीस होता. त्यामुळे तो उपचाराला योग्य प्रतिसाद देत नव्हता अशी माहिती मिळत आहे. कोरोनाचा विळखा 100 हून अधिक देशांना बसला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या