Home /News /mumbai /

कोरोनाला संपवण्यासाठी रोहित पवारांनी केलं खास आवाहन, सुचवली नवी आयडिया!

कोरोनाला संपवण्यासाठी रोहित पवारांनी केलं खास आवाहन, सुचवली नवी आयडिया!

रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करून नागरिकांना आवाहन केलं आहे.

    मुंबई, 02 एप्रिल : महाराष्ट्रावर कोरोना व्हायरस संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यात पुढाकार घेत नागरिकांना आवाहन केलं आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करून नागरिकांना आवाहन केलं आहे. आपल्याला प्रत्येकाला देशावर नितांत प्रेम आहे.  पण आज देशापुढे कोरोना  व्हायरसचं महासंकट उभं ठाकलं आहे. यातून देशाला बाहेर काढण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे आणि आपण करत आहोत. यात वैद्यकीय सेवा, पोलीस, वैज्ञानिक यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअॅपवर आपला डीपी हा राष्ट्रध्वज ठेवण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 338 वर दरम्यान, आजही राज्यात 3 नवे रुग्ण आढळून आले आहे. पुण्यात 2 आणि बुलडाण्यात एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 338 वर पोहोचली आहे. काल बुधवारपर्यंत ही संख्या 335 वर होती. चिंतेची बाब म्हणजे, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली होती. त्यातच आज आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहे. तर बुलडाण्यात आणखी एक रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. बुलडाण्यात या आधी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. बुलडाण्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 5 वर पोहोचली आहे. दरम्यान, देशभरात  बुधवारी संध्याकाळी 437 नवीन नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 1900 झाली असून आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या