मुंबई, 02 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेत राजकीय पक्षांचे प्रमुख देखील सहभागी होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल, याबद्दल पंतप्रधान मोदींशी चर्चा केली.
हेही वाचा - 'या' शहरात पडलाय मृतांचा खच, रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच झाला कोरोना
देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. राज्यातील परिस्थितीवर मोदींनी आढावा घेतला. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे वर्षा येथून सहभागी झाले होते. यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कसा रोखता येईल, यावर चर्चा झाली.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी केंद्राकडे विशेष पॅकेजची मागणी केली होती.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1900 वर
दरम्यान, देशभरात बुधवारी संध्याकाळी 437 नवीन नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 1900 झाली असून आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -शरद पवारांनी अखेर सोडलं मौन, मरकजच्या घटनेवर दिली पहिली प्रतिक्रिया
कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तीन राज्यांमध्ये 24 तासांत मोठ्या प्रमाणात नवीन केसेस समोर आल्या आहेत. दिल्लीत 53 नवीन जण पॉझिटिव्ह आढळल्यानं इथली संख्या 152 तर महाराष्ट्रात 36 नव्या केसेस आढळल्यानं 338 वर संख्या पोहोचली आहे.
-
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.