Home /News /mumbai /

मोबाईल व्हायब्रेट झाला तर समजा जवळ कोरोनाचा रुग्ण, अ‍ॅप डाउनलोड करणे पडले महागात!

मोबाईल व्हायब्रेट झाला तर समजा जवळ कोरोनाचा रुग्ण, अ‍ॅप डाउनलोड करणे पडले महागात!

चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असताना फक्त 9 देश असे आहेत ज्या देशांमध्ये अद्याप कोरोना व्हायरस पोहोचलेला नाही.

चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असताना फक्त 9 देश असे आहेत ज्या देशांमध्ये अद्याप कोरोना व्हायरस पोहोचलेला नाही.

या अ‍ॅपमुळे कोरोनाची बाधा झाली आहे की नाही हे लगेच कळेल, असा दावा करण्यात आला होता.

    मुंबई, 30 मार्च : देशावर कोरोना व्हायरसने मोठे संकट आले आहे. देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे.  कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरलेले आहे. पण, अशाही परिस्थितीतही गुन्हेगार गुन्हा करण्यापासून धजावत नाहीये. मुंबईतील गोरेगावमध्ये एका व्यक्तीला तब्बल 1 लाख 06 हजाराला गंडा घातला आहे. अभिजीत गवळी असं या व्यक्तीचं नाव आहे. कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यासाठी त्यांना एक अ‍ॅप निदर्शनास आला होता. या अ‍ॅपमुळे कोरोनाची बाधा झाली आहे की नाही हे लगेच कळेल, असा दावा करण्यात आला होता. मोबाईलमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर जर तुमचा मोबाईल व्हायब्रेट झाला तर तर समजा तुमच्या जवळील व्यक्तीचा कोरोनाची लागण झाली आहे, असा दावा या अ‍ॅपकडून करण्यात आला होता. हेही वाचा - 'भारताला 21 नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन वाचवू शकतो', तज्ज्ञांचा इशारा अभिजीत गवळी यांनी मागील गुरुवारी हा अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला. त्यानंतर त्यांना एक ओटीपी आला. हा ओटीपी अ‍ॅपमध्ये टाकण्यास सांगितले. त्यानंतर मिळालेल्या सुचनेनुसार त्यांनी ओटीपी अ‍ॅपमध्ये टाइप केला. हेही वाचा - Fact check - भरपूर पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो? त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी अभिजीत गवळी यांच्या खात्यातून त्यांच्या संपूर्ण पगारासह 1 लाख 06 हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. हा मेसेज पाहून गवळी यांना एकच हादरा बसला. त्यांनी तातडीने बँकेला याबद्दल माहिती कळवली. तसंच वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून तपास सुरू आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या