Home /News /mumbai /

धक्कादायक! इमारत सील असताना डॉक्टराकडे जावू न दिल्यामुळे वृद्धाचा मृत्यू

धक्कादायक! इमारत सील असताना डॉक्टराकडे जावू न दिल्यामुळे वृद्धाचा मृत्यू

मुंबईतील कुर्ला भागात 30 मार्च रोजी कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला होता.

मुंबई, 31 मार्च : मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील कुर्ला  भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे परिसर सील करण्यात होता. यावेळी उपचारासाठी बाहेर न जावू दिल्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला भागात 30 मार्च रोजी कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला होता. ज्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता, त्याच इमारतीत राहणाऱ्या  70 वर्षीय विनायक संभाजी गायकवाड यांचं निधन झालं आहे. हेही वाचा - बायकोच्या औषधासाठी 70 वर्षांच्या चाचांनी जे केलं ते वाचून व्हाल हैराण! विनायक गायकवाड यांची सोमवारी रात्री तब्बेत बिघडली. पण पोलिसांनी बिल्डिंग सील केल्यामुळे डॉक्टराकडे जावू दिले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. परिणामी त्यांची तब्बेत जास्त खालावली. आज सकाळी विनायक गायकवाड यांचं राहत्या घरात निधन झालं. गायकवाड ज्या इमारतीमध्ये राहतात, त्याच इमारतीत एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे इमारत सील करण्यात आली होती. हेही वाचा -VIDEO : 'मुंबईकरांनो मी तुमच्यासमोर हात टेकते', महिला सरपंचाला अश्रू अनावर दरम्यान, सोमवारी राज्यात कोरोनाचे 47 नवे रुग्ण समोर आले तर आज पुन्हा 5 नव्या रुग्णांना कोरोना झाला असल्याचं समोर आलं आहे. एक रुग्ण मुंबईत, 2 पुण्यात आणि 2 बुलढाण्यात असे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 225 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या