त्याला संशय आला आणि स्वत: रुग्णवाहिकेनं रुग्णालयात पोहोचला, आता...

त्याला संशय आला आणि स्वत: रुग्णवाहिकेनं रुग्णालयात पोहोचला, आता...

वसई-विरारमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला. पहिला रूग्ण ज्या परिसरात आढळला त्याच परिसरात दुसरा रुग्णही आढळला आहे.

  • Share this:

 

वसई, 28 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मुंबई नजीकच्या उपनगरातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

वसई-विरारमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला. पहिला रूग्ण ज्या परिसरात आढळला त्याच परिसरात दुसरा रुग्णही आढळला आहे. वसई एव्हरशाईनमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. दुसरा रुग्ण हा दुबईवरून तीन ते चार दिवसांपूर्वी आला होता. त्याला लक्षणं जाणवू लागल्याने तो खाजगी रुग्णवाहिकेने कस्तुरबा इथं तपासणीसाठी गेला. डॉक्टरांनी जेव्हा या तरुणाची वैद्यकीय चाचणी केली. तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

हेही वाचा - जबलपूर आर्मी बेस वर्कशॉपमध्ये भीषण स्फोट; जवान शहीद, तीन जखमी

त्यामुळे आता वसई विरारमध्ये रुग्णांची संख्या दोनवर पोहचली आहे. पहिला रुग्ण हा सिडनीमधून आला होता. त्यामुळे त्याच्या घरातील सदस्यांची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे घरातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची बाधा झाल्याचं आढळलं नाही.

दुसऱ्या रुग्णाचे नातेवाईकसुद्धा कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या तपासण्या सुरू आहेत. तसंच तो इतक्या दिवसात कुणाच्या संपर्कात आला याचा शोध सुरू आहे. तसंच ज्या रुग्णवाहिकेनं हा तरुण रुग्णालयात गेला होता. त्या रुग्णवाहिकेच्या चालकाचीही तपासणी सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा -'सॉरी! काही लोक मरणारच, पण म्हणून देश बंद करायचा का?'

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या आता 167 वर पोहोचली आहे. त्यात मुंबईत 7 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर नागपूरमध्ये 1 जण आढळला आहे. असे 8 रुग्ण वाढले आहेत. मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये 4 महिला आणि 3 पुरूष दाखल आहेत. तसंच, सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कोरोनाग्रस्त दाखल आहेत.

First published: March 28, 2020, 5:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या