मासे,आंबे विक्री आणि हॉटेलमधून फूड डिलिव्हरीबाबत सरकारची दिलासादायक घोषणा

मासे,आंबे विक्री आणि हॉटेलमधून फूड डिलिव्हरीबाबत सरकारची दिलासादायक घोषणा

'कोकणातील आंबे, नाशिकचे द्राक्ष देखील बाजारात विकत येणार आहे. विक्रेत्यांनी फक्त विक्री करताना काळजी घ्यावी'

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे लोकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली आहे. परंतु, आता राज्य सरकारने मासे विक्रीसाठी परवानगी दिली आहे.

राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या संकटकाळात RBI कडून रेपो रेटमध्ये मोठी कपात, गृहकर्ज होणार स्वस्त

तसंच, राज्यात संचारबंदी लागू झाल्यामुळे सर्वच हॉटेल व्यवसाय बंद झाले आहे. त्यामुळे मुंबईत चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहे. त्या पॉर्श्वभूमीवर  हॉटेलमधून जेवण मागवता येणार  आहे. फक्त अन्न डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांनी योग्य ती काळजी घ्यायची आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी महत्त्वाची माहितीही पवार यांनी दिली.

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त असल्यानं यात काहीसा संथपणा आला आहे. पण, सध्या कोरोनाविरोधातील कामाला प्राधान्य दिले आहे. या  संकट जसे दूर झाले की, लगेच हे काम हाती घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र, उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे, असंही ते म्हणाले.

शहराला फळभाज्या, फळं जे ट्रक वाहतूक करणार आहे. आधीच परवाने देण्यात येत आहे. तसंच या वाहनांना पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा -तरुणाचा कहर, हळदी अन् लग्नात झाला हजर, मित्रांना मॅसेज करून सांगितलं मला कोरोना

साखर कारखान्यात ऊस गळतीला आणावा, जे ऊसतोड मजूर येतील त्यांच्या जेवणाची काळजी कारखानदारांना घ्यावी लागणार आहे, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारने सैन्य दलाला पत्र लिहिले आहे. फक्त सैन्य दलाची वैद्यकीय मदत गरज लागल्यास मिळावी, इतक्यासाठी संपर्कात आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

First published: March 27, 2020, 1:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या