मुंबईत एकाच ठिकाणी आढळले 5 ते 7 कोरोनाबाधित, संपूर्ण परिसर सील!

मुंबईत एकाच ठिकाणी आढळले 5 ते 7 कोरोनाबाधित, संपूर्ण परिसर सील!

मुंबईतील वरळी कोळीवाडा गावात 5 ते 7 कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

  • Share this:

मुंबई, 30  मार्च : महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आहे. मुंबईतील वरळी कोळीवाडा गावात 5 ते 7 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील वरळी कोळीवाडा गावात 5 ते 7 कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाडा गावाला पोलिसांनी चारही बाजूने सील केलं आहे. तसंच याच परीसरात आज सकाळपासून मुंबई महापालिकेच्याकडून निर्जंतुकरण करायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा - घरी परतलेल्या मजुरांशी अमानवीय वागणूक, रस्त्यावर एकत्रित बसून औषधांची फवारणी

वरळी कोळीवाड्यातील कुठल्याही व्यक्तीला बाहेर सोडलं जात नाही आहे. तसंच बाहेरली देखील कुठल्याही व्यक्तीला आत जाऊ दिले जात नाही. संचारबंदीचे कडक निर्बंध वरळी कोळीवाडा गावात सध्या लागू करण्यात आले आहे.

पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा पहिला मृत्यू

दरम्यान,पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात 52 वर्षाच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1024 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशभरात 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -भारतात WhatsApp युजर्सवर निर्बंध, कोरोनामुळे आता वापरावर अशा मर्यादा

भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर जवळपास केरळसह इतर राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर शनिवारपर्यंत 155 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आहे. मुंबईतील 14, पुण्यातील 15, नागपूर आणि औरंगाबादमधून एक तर यवतमाळमधून तीन असे एकूण 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

First published: March 30, 2020, 4:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading