मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईकरांच्या या स्पिरिटमुळे धोका आणखी वाढणार...

मुंबईकरांच्या या स्पिरिटमुळे धोका आणखी वाढणार...

राज्यात कलम 144 अर्थात जमाव बंदी सुरु आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच परवानगी असताना खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून जावू लागली.

राज्यात कलम 144 अर्थात जमाव बंदी सुरु आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच परवानगी असताना खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून जावू लागली.

राज्यात कलम 144 अर्थात जमाव बंदी सुरु आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच परवानगी असताना खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून जावू लागली.

मुंबई, 23 मार्च : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार पसरला आहे. जगभरात 13 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात 24 तासांत तब्बल 15 रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. यावर आळा घालण्यासाठी रविवारी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला खरा पण आजचं मुंबईकरांचे स्पिरिट पाहता धोका वाढणार असल्याचं चिन्ह आहे.

मुंबईकरांचं एक दिवसाचं स्पिरिट संपलं आणि आज असंख्य मुंबईकर रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी गाड्यांची गर्दी झाली आहे. रस्त्यांवर लोकांची वर्दळ वाढली आहे. आज पुन्हा एकदा मुंबईकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले पाहायला दिसतात. सायन या ठिकाणी वाहनांची कोंडी पोलीस वाहनाचे करून अत्यावश्यक काम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोडत आहेत.

ठाणे मुलूंड टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीला नागरीक जबाबदार आहे. लाॅकडाउन जुगारुन लोकं रस्त्यावर उतरली आहेत. टोल नाक्यावरुन जाल तर कलम 144 उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आज सकाळपासूनच ठाणेहून मुंबईच्या दिशेने जाणा-या आनंदनगर टोलनाक्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळाली.

कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊन पुरेसे नाही तर..., WHOच्या वक्तव्याने खळबळ

याच कारण गाड्यांची जास्त संख्या होतीच त्याच सोबतच राज्यात कलम 144 अर्थात जमाव बंदी सुरु आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच परवानगी असताना खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून जावू लागली. यामुळे मुंबई आणि ठाणे पोलिसांनी या गाड्यांना ठाणे मुंबईच्या वेशीवरच अडवायला सुरुवात केली आणि अगदीच आवश्यक असणा-यांना मुंबईला जाऊ दिले गेले. ज्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली त्यांच्यावर कलम 144 उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. हातात माईक घेऊन पोलीस वाहनचालकांना आवाहन करत असूनदेखील वाहन चालक पोलिसांशी हुज्जत घालत आहेत.

Coronavirus पासून वाचण्यासाठी घरात असं करा सॅनिटाइझ

First published:
top videos

    Tags: Corona