मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Coronavirus : महाराष्ट्रात लॉकडाउन नाही! लोकल, बस बंद नाहीत; पण...

Coronavirus : महाराष्ट्रात लॉकडाउन नाही! लोकल, बस बंद नाहीत; पण...

मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं.

मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं.

मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
मुंबई, 17 मार्च :  राज्यभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी राज्य शासन कठोर उपाययोजना करणार असल्याचं स्पष्ट आहे. महाराष्ट्रात Coronavirus ने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात Covid-19 पॉझिटिव्ह असलेल्या पहिल्या रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला. तो मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं. लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सरकारी कार्यालयातली गर्दी कमी व्हावी यासाठी नागरिकांनी ई मेल मार्फत आपल्या तक्रारी कराव्यात असं आवाहन सरकार करणार आहे. निम्म्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच कामकाज करता येईल का हेही राज्य सरकार तपासून पाहात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वाचा - महाराष्ट्रात असा शिरला Coronavirus! तेव्हाची एक चूक पडली महाग लोकल बंद करायची की नाही यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मास्क सॅनिटाझयरची बनावट विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा टोपेंनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं तर सुरक्षित आणि आरोग्यदायी रहा असा सल्ला दिला आहे.
!function(e,i,n,s){var t="InfogramEmbeds",d=e.getElementsByTagName("script")[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement("script");o.async=1,o.id=n,o.src="https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async"); महाराष्ट्रात लॉकडाउन नाही सध्या सरकारने मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा , स्विमिंग पूल, सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मात्र संपूर्ण लॉक डाऊन केल्यास नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येणार नाही. सध्या चीननंतर इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. जर्मनी आणि फ्रान्सनेही संपूर्ण लॉकडाउन घोषित केला. वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दुकानबंदीनंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय त्यामुळे केवळ गरज असेल अशाच परिस्थिती लोकांना घराबाहेर पडता येईल. लॉक डाऊनमध्ये केवळ अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा असते. ट्रेन, बस, हॉटेल, रेस्टॉरंट आणि रुग्णालयं वगळता सार्वजनिक सेवा बंद ठेवण्यात येतात. संचारबंदीसारखी परिस्थिती ओढवते. अन्य बातम्या कोरोनापासून वाचण्यासाठी गेले आणि घात झाला, 46 जणांचा जीव धोक्यात कसं शक्य आहे? चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार, शेजारील देशात मात्र एकही रुग्ण नाही
First published:

Tags: Coronavirus, Mumbai local

पुढील बातम्या