Home /News /mumbai /

मंत्रालयात पोहोचला कोरोना? कर्मचाऱ्यांची Work From Home ची मागणी

मंत्रालयात पोहोचला कोरोना? कर्मचाऱ्यांची Work From Home ची मागणी

मंत्रालयातल्या एका विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई, 16 मार्च : कोरोनाव्हायरसचा प्रसार महाराष्ट्रात दिवसेंदिवस वेगाने वाढतो आहे. शहरांमधल्या शाळा, महाविद्यालयं आणि सार्वजनिक स्थळं बंद केली तरी सर्वच कर्मचारी घरून काम करण्याची सोय वापरू शकत नाहीत. आता खुद्द मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनीच आम्हाला घरून काम करू देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मंत्रालयातल्या एका विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळेच महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी coronavirus चा प्रसार टाळण्यासाठी शक्यतो कर्मचाऱ्यांना घरून काम करू देण्याची मुभा द्यावी, असं आवाहन संस्था आणि खासगी कंपन्यांना केलं होतं. त्या अनुषंगाने आता शासकीय कर्मचाऱ्यांनीच तशी मुभा आपल्याला मिळावी, अशी मागणी केली आहे. संबंधित - राज्यासाठी पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे, मुख्यमंत्र्यांचं जनतेला सतर्क राहण्य महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं बंद ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय व्हावा, अशी मागणी केली आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या 6000 कर्मचाऱ्यांपैकी 97 ते 98 टक्के कर्मचारी लोकल ट्रेन किंवा बस अशा गर्दीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून कार्यालयात पोहोचतात. अशा गर्दीच्या ठिकाणी गर्दीच्या वेळी प्रवास करून कामावर येताना कोरोनाव्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेता येणं शक्य नसतं, असं या संघटनेनं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. कल्याण येथे राहणाऱ्या मंत्रालयातील एका विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण सापडल्याने मंत्रालयात खळबळ उडाली. त्याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. Covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय योजणं आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी, अशी मागणी  राजपत्रित कर्मचारी संघटनेने केली आहे. वाचा - पुणेकरांनो घाबरून जाऊ नका...फक्त या 21 गोष्टी नीट लक्षात ठेवा! दरम्यान, राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39वर गेली आहे. मुंबईतला कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 5 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आहे. मुंबई आणि नवी मुंबईत नवीन ही नवीन रुग्णांची भर पडली आहे. रोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अन्य बातम्या कोरोनाची दहशत: इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद पुण्यात पहिला गुन्हा दाखल, कोरोनाची अफवा पसरवणं पडलं महागात
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या