मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत कोरोनाचा धोका वाढला एकाच दिवसात सापडले 106 नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाचा धोका वाढला एकाच दिवसात सापडले 106 नवे रुग्ण

People rest at a shelter set up for migrant workers from other Indian states affected by the coronavirus lockdown in Mumbai, India, Monday, April 6, 2020. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (AP Photo/Rafiq Maqbool)

People rest at a shelter set up for migrant workers from other Indian states affected by the coronavirus lockdown in Mumbai, India, Monday, April 6, 2020. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (AP Photo/Rafiq Maqbool)

'कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहाता मुंबई- पुण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई आणि पुण्यात मास्क वारपणे बंधनकारक करण्यात आले आहेत.'

मुंबई 08 एप्रिल : मुंबई हा फक्त राज्याचाच नाही तर देशाचा कोरोना हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत आज कोरोनाचे 106 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 696 एवढी झालीय. तर 5 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 45 झाली आहे. आज एकाही रुग्णाला सुट्टी देण्यात आलेली नाही. आत्तापर्यंत एकूण 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकूण संशयितांसह 313 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. तर आतापर्यंत 11 हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. राज्यातल्या आजच्या बाधितांची संख्या 117 असून राज्यात 1135 एकूण बाधित रुग्ण झाले आहेत. कोरोना विषाणूने राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. संपूर्ण राज्यासाठी पुढील 7-8 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे, सगळ्यांनी खबरदारी घ्या, सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करा, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहाता मुंबई- पुण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई आणि पुण्यात मास्क वारपणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. हेही वाचा - पुण्यात चिंता वाढवणारा दिवस; गेल्या 24 तासांत 8 मृत्यू! आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सुदैवाने राज्य कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये नाही. सध्या राज्यात रुग्णांची बेरीज होत आहे. गुणाकार होताना दिसत नाही.  मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या मृतांची संख्या जास्त आहे. ही चिंतेची बाब आहे. राज्यात बुधवारी 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हेही वाचा - आशेचा किरण! देशातील 400 जिल्ह्यांमध्ये Covid – 19 चा एकही रुग्ण नाही अमेरिका, इटलीसारख्या अनेक देशांच्या तुलनेत देशात कोरोना रुग्णांची वाढ गुणाकाराच्या पद्धतीने होण्याची भीती वाटत होती. मात्र, सुदैवाने तसे होत नाही आहे.  देशांमध्ये 30 व्या दिवशी 1 लाख 21 हजार इतके संसर्ग झालेले रुग्ण आहेत. त्याच्या तुलनेत आपल्या देशात या रुग्णांची संख्या 5000 दरम्यान आहे.
First published:

पुढील बातम्या