Home /News /mumbai /

महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी, मुंबईत एकाचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी, मुंबईत एकाचा मृत्यू

ऑस्ट्रिया - आतापर्यंत 9,851 लोकांना लागण आणि 128 मृत्यू.

ऑस्ट्रिया - आतापर्यंत 9,851 लोकांना लागण आणि 128 मृत्यू.

कोरोनामुळे मृत्यू झालेला 65 वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता.

    मुंबई, 24 मार्च : कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील प्रभाव वाढत चालला असून कोरोनाबाधितांची संख्या 101 वर पोहोचली आहे. अशातच मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला 65 वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनासाठी त्रास होत असल्याने 23 मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाचा हा तिसरा बळी आहे. सदरच्या रुग्णाला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचाही त्रास होत होता. जेव्हा त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर काल संध्याकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, भारतामध्ये एकीकडे 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 97 होती पण आता कोरोनाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा 1 असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 101 वर पोहोचल्यानं भीती आणि चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्फ्यू लागू केला आहे. जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. 15 हजारहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हा व्हायरस आता वेगानं पसरत असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी पंजाबमध्ये सर्वात पहिल्यांदा कर्फ्यू लावण्यात आला होता. महाराष्ट्रातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कर्फ्यू लावला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या