आनंदाची बातमी : कोरोना प्रतिबंधक औषधांचा पुरवठा सोमवारपासून सुरळीत होणार

आनंदाची बातमी : कोरोना प्रतिबंधक औषधांचा पुरवठा सोमवारपासून सुरळीत होणार

कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्यांच्यावरील उपचाराची कमी पडत असलेली यंत्रणा हा चिंतेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : राज्यातील मोठ्या शहरांपासून गाव-खेड्यापर्यंत कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेत अनेक स्थानिक स्वराज्य संस्था लॉकडाऊनचा निर्णय घेत आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्यांच्यावरील उपचाराची कमी पडत असलेली यंत्रणा हा चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच अन्न आणि औषध प्रशासना मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे.

'कोरोना प्रतिबंधक औषधीचा सोमवारपासून सुरळीत पुरवठा करण्यात येईल,' अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली आगे. उत्पादित कंपन्या आणि मोठे वितरक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली आहे. प्राथमिक लक्षण दिसणाऱ्या रुग्णांना या औषधाची आवश्यकता नाही, याची रुग्णाच्या नातेवाईकांनी नोंद घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

कोरोनावरील लस कधी येणार?

जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लशीवर काम सुरू आहे. भारतातही 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाचं वॅक्सीन लाँच करण्यात येईल असं सांगण्यात येत आहेत. मात्र संसदीय समितील दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस 2021 आधी उपलब्ध करून देणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे. ही लस सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी 2021 साल उजाडेल असाही अंदाज आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. या वर्षात कोरोनाची लस तयार करून ती सर्वत्र उपलब्ध करणं शक्य नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2021च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध होऊ शकेल, असं सांगण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 11, 2020, 2:53 PM IST

ताज्या बातम्या