Home /News /mumbai /

लॉकडाऊनचा काळ खरंच अजून वाढणार का? शरद पवार म्हणतात...

लॉकडाऊनचा काळ खरंच अजून वाढणार का? शरद पवार म्हणतात...

राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह द्वारे लोकांशी संवाद साधला आहे.

  मुंबई, 30 मार्च : राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह द्वारे लोकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी लोकांना घरातच राहण्याचं आणि कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच यावेळी शरद पवार यांनी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर दिली. 'लॉकडाऊनचा काळ अजून वाढेल अशा अफवा पसरवण्यात येत आहेत...त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?' असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन संपायला अजून 2 आठवडे आहेत. या काळात लोकांनी जर नीट काळजी घेतली तर कदाचित हा काळ अजून वाढवण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी.' वाचा-21 दिवसांनंतर वाढवणार लॉकडाऊन? मोदी सरकारने दिलं उत्तर लॉकडाऊूनच्या घोषणेनंतर राज्यातील उसतोड मजुरांची स्थिती बिकट झाली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपण साखर कारखानदारांना याबाबत सूचना दिली असल्याचं सांगितलं आहे. 'तुमच्या कारखान्याची तोड पूर्ण झाली असो वा नसो, तुमच्याकडील ऊसतोड मजुरांची सोय तुम्ही करावी, अशा सूचना मी साखर कारखानदारांना दिल्या आहेत,' असं शरद पवार म्हणाले. वाचा-कोरोनाचं थैमान, 12 तासांत 12 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 215 वर दरम्यान, शरद पवार यांनी 27 मार्च रोजीही फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी केंद्र सरकारच्या काही निर्णयांचं स्वागत केलं. मात्र त्याचवेळी काही अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या. वाचा-'भारताला 21 नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन वाचवू शकतो', तज्ज्ञांचा इशारा 'आजचं संकट गंभीर...दीर्घकालीन परिणाम करणारं आहे. प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारं हे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून मी घराबाहेर पडलो नाही. मी कुणालाही भेटलेलोही नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध संस्थांवर मोठी जबाबदारी आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून शेतकरी, असंघटीत कामगार, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याबाबत काही मागण्या केल्या होत्या.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona, Sharad pawar

  पुढील बातम्या