महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे? रुग्णसंख्येत आज मोठी वाढ

महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे? रुग्णसंख्येत आज मोठी वाढ

नागरिकांना पुढील काळात कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : दिवाळीनंतर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. अनेक तज्ञांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण राज्यात आज कोरोनाचे साडे सहा हजार रुग्ण आढळले आहेत. तसंच 65 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. आज 4 हजार 800 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यासह देशात थैमान मांडलं होतं. मात्र मध्यंतरीच्या काळात कोरोनाला आटोक्यात आणण्यात शासन-प्रशासनाला यश मिळाले. राज्यातील कोरोना रुग्णांमध्येही मोठी घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा ही संख्या वाढीस लागल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील काळात कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे.

उपचारांबाबत मंत्र्यांनी दिल्या नव्या सूचना

मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो यासाठी धर्मादाय रूग्णालयांनी सहकार्य करून, गरीब रूग्णांची सेवा करावी अशा सूचना विधी व न्याय विभाग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे 10 टक्के गरीब रूग्णांना मोफत उपचार देण्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व विधी परामर्शी आर.एन. लढ्ढा, धर्मादाय आयुक्त आर.एन.जोशी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव नितीन जिवणे आदींसह अधिकारी आणि विविध धर्मादाय रूग्णालयांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Published by: Akshay Shitole
First published: November 25, 2020, 7:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading