मुंबईत नव्हे, कल्याण-डोंबिवली, ठाण्यात वाढतोय Corona; रुग्णवाढीचे धक्कादायक आकडे आले समोर

मुंबईत नव्हे, कल्याण-डोंबिवली, ठाण्यात वाढतोय Corona; रुग्णवाढीचे धक्कादायक आकडे आले समोर

ठाणे, कल्याण-डोंबवली, मीरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांमध्ये आणि प्रचंड वेगाने Covid चे रुग्ण वाढत आहेत. Doubling rate चे आकडे धक्कादायक आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 जून : भारताचा Coronavirus चा हॉटस्पॉट म्हणून साऱ्या जगाचं मुंबईकडे लक्ष आहे. मुंबईतही रुग्णसंख्या देशात अजूनही सर्वांत जास्त असली तरी त्यापेक्षाही मोठा धोका मुंबई महापालिकेबाहेर असणाऱ्या क्षेत्रात वाढलेला आहे. MMR म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे (Thane), कल्याण-डोंबवली (KDMC), मीरा भाईंदर (mira bhayandar), भिवंडी, उल्हासनगर या महापालिका क्षेत्रांमध्ये आणि आसपासच्या मोठ्या उपनगरांमध्ये प्रचंड वेगाने Covid  चे रुग्ण वाढत आहेत. रुग्ण दुप्पट व्हायचा काळही (doubling rate) मुंबईच्या मानाने खूप कमी आहे. मुंबईच्या लोकसंख्येच्या मानाने तिथली साथ आटोक्यात आहे, असं म्हणता येईल पण मुंबई बाहेरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे.

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवसांवर आला आहे. हाच कालावधी कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त 12 दिवसांचा आहे. ठाण्यात 20 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (16 July) जारी केलेल्या कोविड आकडेवारीत सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण ठाणे जिल्ह्यात आहेत. मुंबईपेक्षाही ठाण्यात अॅक्टिव्ह केसेस जास्त आहेत.  मुंबईचा रुग्णवाढीचा आलेख सपाट होण्याच्या मार्गावर आहे. पण ठाणे जिल्ह्याचा वाढतो आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढीचा वेग कल्याण-डोंबिवलीत आहे. त्यानंतर मीरा भाईंदर, ठाणे शहर, उल्हासनगर आणि भिवंडीतही रुग्णवाढ मोठी आहे. पालघर जिल्ह्यात मोडणाऱ्या वसई विरार महापालिकेत झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत.

16 जुलैची आकडेवारी

अॅक्टिव्ह केसेस

मुंबई - 24307

ठाणे - 34821

पालघर - 4805

रायगड - 4779

रुग्ण दुप्पट होण्याचा वेळ (दिवसांमध्ये)

मुंबई -  52

ठाणे - 20

कल्याण डोंबिवली - 12

वसई विरार - 12

मीरा भाईंदर - 15

उल्हासनगर - 14

भिवंडी निजामपूर - 23

16 जुलैची महापालिकानिहाय आकडेवारी (स्रोत - आरोग्य मंत्रालय)

मुंबईत दररोज रुग्णसंख्या वाढत असली, तरी चाचण्यांचं प्रमाणही वाढत आहे. धारावीसारख्या झोपडपट्टी भागात सर्वाधिक धोका होता. तो आता नियंत्रणात आणला आहे. पण खरा धोका वाढतोय तो मुंबई महापालिकेबाहेरच्या उनगरांत. लोकसंख्येच्या तुलनेत या उपनगरांत कोरोनारुग्णांची संख्या धडकी भरवणारी आहे. विशेषतः कल्याण डोंबवली, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, भाईंदर आणि ठाण्यात परिस्थिती कठीण होत आहे.

'उपनगरांसह मुंबई महानगर भागात  कोरोना चाचण्या नियंत्रित केल्या जात आहेत, तर दुसरीकडे बळीसंख्येत जुने दडविलेले मृत्यू रोज अधिक होत आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा समग्र आढावा घ्यावा आणि त्यावर उपाययोजना कराव्या', अशी मागणी करणारं पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यात त्यांनी उपनगरातल्या संसर्गाची आकडेवारी दिली होती.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 16, 2020, 9:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading