Home /News /mumbai /

‘करोना’बाधितांची संख्या वाढल्याने मुंबई हादरली, वाचा 24 तासांमधली राज्यातली प्रत्येक अपडेट

‘करोना’बाधितांची संख्या वाढल्याने मुंबई हादरली, वाचा 24 तासांमधली राज्यातली प्रत्येक अपडेट

देशात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 17 वर्षांपेक्षा कमी वयाचे 1 टक्के रुग्ण 18-25 एक टक्के रुग्ण, 26-44 वयोगटाचे 11, 45-60 वयोगट 36 तर 60पेक्षा जास्त वयोगटाचे 51 टक्के रुग्ण आहेत.

देशात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 17 वर्षांपेक्षा कमी वयाचे 1 टक्के रुग्ण 18-25 एक टक्के रुग्ण, 26-44 वयोगटाचे 11, 45-60 वयोगट 36 तर 60पेक्षा जास्त वयोगटाचे 51 टक्के रुग्ण आहेत.

महाराष्ट्रा आणि मुंबई अतिशय वेगाने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने देशभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई 05 मे: मुंबईला असलेला कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत आज 635 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 10 हजारांच्या जवळ म्हणजे 9945 वर पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा हादरा बसला आहे. आज मुंबईत कोरोनामुळे 26 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामुळे मुंबईतल्या मृत्यूची एकूण संख्या 387 झाली आहे. आज 220जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 2128 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. आज राज्यात 841 नवीन रुग्णांची भर पडली. तर 34 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 525वर गेली आहे. त्यात आज 354 रुग्ण डिस्चार्ज दिला गेला. आजपर्यंत एकूण 2819 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. आज मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक मुंबईत 26 रुग्ण आहेत तर पुण्यात 06 औरंगाबाद आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एक रूग्ण आहे. गेल्या दोन दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये सुट देण्यात आल्याने सगळीकडेच गर्दी वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत येत्या काही दिवसांमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन संपायचे दिवस आणि रुग्णांची संख्या वाढायची वेळ एकच होत आहे. तर टेस्टिंग वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळून आलेत. दारुमुळे अख्खं कुटुंब झालं उद्ध्वस्त; पती-पत्नीमधील वादामुळे 4 जणांचा गेला बळी त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या वाढून 46433 झाली आहे. त्यात 32138 Active रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 195 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्तची ही सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा 1568वर गेला आहे. तर आत्तापर्यंत 12726 जण बरे झाले आहेत. धोकादायक बनलेल्या मुंबई, पुण्यात दिलासा देणारी बातमी, सर्वाधिक रुग्ण झाले बरे महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडू हे कोरोना वेगाने वाढणारं दुसरं राज्य झालं आहे. तिथे एकाच दिवसांत 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आता 12 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या