मुंबईतील 'या' 5 शहरांमध्ये आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन! काय राहणार बंद?

मुंबईतील 'या' 5 शहरांमध्ये आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन! काय राहणार बंद?

एकीकडे देशात आणि राज्यात अनलॉक 2.0 ला (Unlock 2.0) सुरुवात झाली असली तरी, लॉकडाऊन कायम आहे. यात मुंबईतील पाच मोठ्या महापालिकांनी मात्र आजपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच मुंबई हे कोरोनाचे केंद्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे देशात आणि राज्यात अनलॉक 2.0 ला (Unlock 2.0) सुरुवात झाली असली तरी, लॉकडाऊन कायम आहे. यात मुंबईतील पाच मोठ्या महापालिकांनी मात्र आजपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पनवेल यांचा समावेश आहे. या पाच शहरांमध्ये कोरोनाचा होत असलेला उद्रेक पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पनवेल या पालिकांच्या वतीनं शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता मुंबईत कलम 144 कलम लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत केवळ धार्मिक स्थळांना काही अटींसह सूट देण्यात आली आहे.

वाचा-लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधितांवर घरी करावा उपचार? तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

का या 5 शहरांमध्ये होतोय कोरोनाचा विस्फोट?

मे 31 ते जून 30 या कालावधीत मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 94 टक्क्यांनी वाढली. यात ठाणे शहरात 166 टक्के, पनवेल 364 टक्के, मिरा-भाईंदर 414 टक्के तर कल्याण-डोंबिवली 469 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे एक कारण म्हणजे, लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली सूट. अनलॉक 1.0मध्ये या सर्व शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला. लोकल सुरू झाल्यामुळं 60 ते 70 टक्के लोकं कामासाठी प्रवास करू लागली. परिणामी, या 5 महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहचला. त्यामुळेच सध्या 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

वाचा-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : खासगी रुग्णवाहिका घेतल्या ताब्यात

काय बंद राहणार?

या पाचही शहरांमध्ये अत्यावश्यक सेवाची वाहतूक वगळता इतर सर्व सेवा सुविधा बंद राहणार आहेत. या काळात कामाव्यतीरिक्त नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव राहील. अत्यावश्यक बाबीच्या खरेदीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. सर्व व्यावसायिक खाजगी आस्थापना राहणार बंद, जीवनावश्यक वस्तूची उत्पादन केंद्रे सुरु राहतील. सरकारी कार्यालये कमीत कमी कर्मचार्यासह सुरु राहतील मात्र या कर्मचार्यांना 3 फुटाचे सुरक्षित अंतर राखावे लागेल तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल.

वाचा-मोठी बातमी : मुंबईत 144 कलम लागू; कोरोनाचा कहर पाहता घेतला निर्णय

काय सुरु राहणार?

दुध विक्रीची दुकाने सकाळी 5 ते 10 या कालावधीत सुरु राहतील. मेडिकल, रुग्णालये, क्लिनिक, गस सिलेंडर आणि लिफ्ट दुरुस्तीची दुकाने नियमित सुरु राहतील. बँका / एटीएम्स, विमा, टेलिकॉम, आयटी, टपाल आणि डेटासेवा, कृषी मालाची ने-आण सुरु राहील. पाळीव प्राण्याचे रुग्णालय आणि खाद्य दुकाने, जीवनावश्यक वस्तूची वाहतूक, पेट्रोल पंप, गस, तेल एजन्सी, त्यांची गोदामे, करोना नियत्रणासाठी सहाय्य करणाऱ्या सेवा आणि  खाजगी आस्थापना सुरू असतील. तसेच, या काळात 50 नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करता येईल.

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 2, 2020, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading