नव्या कोरोना व्हायरसचा रुग्ण मुंबईच्या वेशीवर? रिपोर्टकडे सगळ्याचं लक्ष

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर संपूर्ण जग सावध झाला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर संपूर्ण जग सावध झाला आहे.

  • Share this:
    कल्याण, 26 डिसेंबर : ब्रिटनमध्ये (britain)कोरोनाचा नवीन विषाणू (coronavirus new strain)आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकाराने खबरदारी घेत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. पण, मुंबई (Mumbai) जवळील कल्याणमध्ये (Kalyan) ब्रिटनमधून परतलेल्या नागरिकाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेल्या इंग्लंड मधून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आलेले नागरीक आल्याची यादी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून कल्याण डोंबिवली महापालिकेला प्राप्त झाली होती. यापैकी 20 जणांची आरटीपीसी आर (RTPCR) टेस्ट करण्यात आली. यातील एका नागरिकाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नागरिकाची प्रकृती स्थिर असली तरीही त्याची अधिकची तपासणी करण्यासाठी त्याचा चाचणी अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीसाठी NIV मुंबई येथून NIV पुणे येथे पाठविण्यात आला आहे. VIDEO - काय म्हणावं या चिमुरड्याला; पालकांवर संतापला, थेट पोलिसांनाच फोन लावला दरम्यान, इंग्लंड आणि ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी नागपूर, औरंगाबाद आणि कल्याणमधील प्रत्येकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. या तिघांचे नमुने पुण्यातील NIV लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या तिघांवरही उपचार सुरू आहेत. पुण्याच्या लॅबमधून येणाऱ्या रिपोर्टकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर संपूर्ण जग सावध झाला आहे. भारतानंही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून 22 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत या कालावधीत येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. तसंच विमानतळांवर प्रवाशांची कोविड चाचणी (Covid Test)अनिवार्य करण्यात आली आहे. यावेळी काही प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
    Published by:sachin Salve
    First published: