मुंबईतला हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीचा आकडा 1000 पार; नव्या आयुक्तांकडून आशा

मुंबईतला हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीचा आकडा 1000 पार; नव्या आयुक्तांकडून आशा

या वस्तीत कोरोनाबळींची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत तब्बल 8 ते 10 लाख नागरिक राहतात. नवे आयुक्त इक्बाल चहल धारावीतल्या समस्यांचे एक्सपर्ट समजले जातात.

  • Share this:

मुंबई, 13 मे : मुंबईत सायन, कुर्ल्याच्या मध्ये पसरलेल्या धारावी झोपडपट्टीत Coronavirus चा शिरकाव झाला आणि आता तो मुंबईचाच नाही तर देशाचा हॉटस्पॉट (Hotspot) ठरत आहे. धारावीतील कोविडग्रस्त रुग्णांचा आकडा 1000 च्या पार गेला आहे. आतापर्यंत 40 मृत्यू धारावीत नोंदले गेले आहेत. आता नव्याने मुंबईच्या आयुक्तपदी रुजू झालेल्या इक्बालसिंग चहल यांच्याकडून हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तातडीचे काय उपाय योजले जातात, याकडे लक्ष आहे.

आज धारावीत कोरोनाचे नवे 66  रुग्ण सापडले. त्यामुळे आतापर्यंत रुग्णांची संख्या 1028 झाली आहे. आज धारावीतल्या 9 मृत्यूंची नोंद झाली. या वस्तीत कोरोनाबळींची संख्या आता 40 वर पोहोचली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत तब्बल 8 ते 10 लाख नागरिक राहतात. तेथील घरं अत्यंत लहान असल्याने लोक तेथे दाटीवाटीने राहतात. त्यामुळे धारावीत कोरोना शिरू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. मात्र धारावीत पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्यांचा फैलाव झपाट्याने झाला.

महाराष्ट्राच्या शेजारी राज्यात जनजीवन सर्वात आधी येणार पूर्वपदावर; 17 तारखेपासून

मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय झाला आणि आता या महाकाय शहराला कोरोना संकटापासून वाचवण्याची जबाबदारी इक्बालसिंग चहल या अधिकाऱ्यावर येऊन पडली आहे. मुंबईचे नवे आयुक्त म्हणून इक्बाल चहल यांनी जबाबदारी स्वीकारली.

ठाण्यात झपाट्यानं वाढतोय कोरोना संसर्ग, पालकमंत्र्यांनी दिले कठोर निर्देश

इक्बाल चहल यांनी यापूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना आशियातल्या या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कानाकोपरा माहिती आहे. या अनुभवाचा वापर कोरोनाला रोखण्यासाठी होऊ शकतो.

धारावीत सध्या कोरोनाचा प्रसार वेगाने होतो आहे. दाटीवाटीची वस्ती, एका घरात अनेकांचा वावर, सार्वजनिक स्वच्छतागृह या रचनेमुळे धारावीत कोरोनाचा धोका वाढतो आहे. आता धारावीचा विशेष अभ्यास असणारा अधिकारी मुंबईच्या आयुक्तपदी आल्यानंतर परिस्थितीत फरक पडू शकतो. त्यांनी रुजू झाल्या झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी धारावीचा दौराही केला होता. तिथली परिस्थिती, सार्वजनिक स्वच्छतागृहं यांची पाहणी करून काही आदेशही दिले होते.

अन्य बातम्या

कोरोनामुळे पती गमावलेल्या शिक्षिकेलाही लागण, तिनेही दुसऱ्याच दिवशी सोडले प्राण

मृत्यूचे आकडे मोजतंय अमेरिकेतील ते घड्याळ; नाव दिलंय ‘ट्रम्प डेथ क्लॉक’

सर्वसामान्य नागरिकांना 3 वर्षांसाठी जाता येईल भारतीय लष्करात?

First published: May 13, 2020, 6:47 PM IST

ताज्या बातम्या