मुंबईने करून दाखवलं! धारावीत आज फक्त 1 नवा रुग्ण; रुग्णसंख्या अधिक तरी साथ नियंत्रणात

मुंबईने करून दाखवलं! धारावीत आज फक्त 1 नवा रुग्ण; रुग्णसंख्या अधिक तरी साथ नियंत्रणात

एके काळी Corona चा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत दिवसभरात 1 रुग्ण सापडला. शहरात नव्या रुग्णांची संख्याही आज सर्वांत कमी आली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जुलै : COVID-19 चा देशात शिरकाव झाल्यानंतर लगेचच मुंबई ही कोरोनाची हॉटस्पॉट (Coronavirus hots pot) बनली होती. कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी सर्वात पोषक वातावरण असूनही मुंबईत ही साथ आता नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. मुंबईत आज दिवसभरात 785 नवे कोरोना रुग्ण सापडले. ही गेल्या महिन्यांतली सर्वांत कमी संख्या आहे. घराघरात जाऊन केलेलं स्क्रीनिंग, संशयितांचं विलगीकरण आणि काँटॅक्ट ट्रेसिंग यामुळे मुंबईच्या नियंत्रणास सर्वात अवघड वाटणाऱ्या भागात साथ आटोक्यात आली आहे.

एके काळी Corona चा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत दिवसभरात 1 रुग्ण सापडला. शहरात नव्या रुग्णांची संख्याही आज सर्वांत आली आहे. गेले काही दिवस दररोज हजारच्या घरात नव्या रुग्णांचं निदान होणाऱ्या मुंबईत नव्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. आता दिल्लीतली रुग्णसंख्या मुंबईपेक्षा अधिक झाली आहे. पण दिल्लीत चाचण्यांचं प्रमाण मुंबईपेक्षा अधिक असल्याने हा आकडा वाढला असल्याचं सांगितलं जातं.

नव्या आयुक्तांनी करून दाखवलं

मुंबईतही Corona रुग्णसंख्या आटोक्याबाहेर जात आहे, असं दिसत असतानाच मुंबईचे प्रशासक बदलले. इक्बाल चहल यांच्याकडे आयुक्तपद आलं. त्यांनी धारावीत यापूर्वीही काम केलेलं असल्याने आल्या आल्या या दाटीवाटीच्या भागातला संसर्ग नियंत्रणात आणण्याचं काम त्यांनी हाती घेतलं.

मुंबईची लोकसंख्या, दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती, जगातली सर्वांत मोठी झोपडपट्टी, दमट हवामान, छोटी घरं अशा सगळ्याच गोष्टी या विषाणूच्या संसर्गाला पोषक आहेत. तरीही या महाकाय शहरात साथ आटोक्यात आली. याला कारण घराघरात जाऊन केलेली नागरिकांची तपासणी आणि काँटॅक्ट ट्रेसिंग हे असल्याचं सांगितलं जातं.

मुंबईचे आकडे

मुंबईत आज निदान झालेले रुग्ण - 785

आजचे मृत्यू - 64

एकूण रुग्णसंख्या - 86,509

एकूण मृत्यू - 5002

मुंबईत नव्या आदेशाने चाचण्याही वाढणार

मुंबईत चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. मुंबईत दररोज 5000 च्या आसपास कोविड चाचण्या होतात. मुंबईत आता दररोज 10 हजार चाचण्या करण्याची क्षमता असलेल्या लॅब आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांची चाचणी होऊन वेळीच उपचार सुरू व्हावेत आणि क्वारंटाइन करता यावं यासाठी चाचणीचे नियम बदलले आहेत.

राज्यात आजही 5000 वर नवे रुग्ण; बळींची संख्या 10 हजारांच्या टप्प्याजवळ

 Coronavirus चा संसर्ग महाराष्ट्रात (Maharashtra news) वाढला आहे. त्यावर अधिकाधिक चाचण्या (COVID-19 Test) करणं आणि विलगीकरण (Isolation) हाच उपाय असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. पण मध्यंतरी देशातल्या लॅबवर बेसुमार ताण येत असल्याने सर्वच संशयितांची किंवा संपर्कांची चाचणी होत नव्हती. आता मात्र मुंबईत डॉक्टर किंवा तज्ज्ञांची शिफारस नसेल तर संशयित रुग्णांची चाचणी होणार आहे. मुंबई महापालिकेनं (BMC) चाचण्यांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला आहे.

डॉक्टरांच्या सर्टिफिकेटशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय अजूनही देशात कुठेही चाचणी होऊ शकत नाही. ICMR च्या नियमाप्रमाणे लक्षणं नसलेल्या( Asymtomatic )रुग्णांची चाचणी होत नव्हती. आता मात्र मुंबईत हा नियम बदलून, ज्यांना शंका आहे अशा सर्व रुग्णांची चाचणी होऊ शकणार आहे. कोणत्याही प्रिस्क्रीप्शन शिवाय चाचणी करता येणारं मुंबई हे देशातील पहिलं शहर ठरेल.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 7, 2020, 8:16 PM IST

ताज्या बातम्या