कहर! मुंबईत आज सर्वाधिक कोरोनामृत्यू; रुग्णांची संख्या 775 वर

कहर! मुंबईत आज सर्वाधिक कोरोनामृत्यू; रुग्णांची संख्या 775 वर

मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आजपर्यंतची सर्वाधिक ठरली. आज एकाच दिवसात 9 जणांचे मृत्यू झाले. त्यामुळे शहरात कोरोनाबळींची संख्या 54 झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आजपर्यंतची सर्वाधिक ठरली. आज एकाच दिवसात 9 जणांचे मृत्यू झाले. त्यामुळे शहरात कोरोनाबळींची संख्या 54 झाली आहे. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे दिवसभरात 79 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर ओपीडीमध्ये 403 जणांना संशयित रुग्ण म्हणून तपासून भरती करण्यात आले आहे.

मुंबई शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 775 वर पोहोचली आहे. ही राज्यातली सर्वाधिक संख्या आहे. देशभरातले सर्वाधिक बळी मुंबईतच गेले आहेत. त्यामुळे देशातला कोरोना हॉटस्पॉट म्हणून आता आपल्या शहराची नोंद होत आहे.

आज दिवसभरात मुंबईतल्या 6 जणांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं. पण तरीही मुंबईतला कोरोना मृत्यूदर इतर देशाच्या तुलनेत अधिक आहे.

मुंबईची कोरोना आकडेवारी

आतापर्यंत मुंबईत कोरोनाग्रस्त -775

आतापर्यंत एकूण मृत्यू-54

आजचे मृत्यू - 9

आज डिस्चार्ज -6

आतापर्यंत एकूण डिस्चार्ज -65

संशयितांसह आज भरती झालेले-403

मुंबईत वरळी, प्रभादेवी आणि धारावी या तीन हॉटस्पॉट्समध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आज मृत्यू झालेल्यांपैकी एक जण धारावीतलाच होता. धारावीतली दाटीवाटीची घरं आणि सार्वजनिक शौचालयं अशी गैरसोय पाहता तिथे कोरोनाची ही साथ थैमान घालण्याची शक्यता आहे.

धारावी हॉटस्पॉट

धारावीत आतापर्यंत तीन जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. आज केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ती धारावीच्या कल्याणवाडी परिसरात राहात असे. मुंबईत वरळी, प्रभादेवीनंतर आता धारावी Coronavirus चा हॉटस्पॉट सर्वांत धोकादायक ठरत आहे.

पाहा - 'मी एकदम फिट'; कोरोनाचा बळी ठरलेल्या पहिल्या डॉक्टरांचा मृत्यूनंतर VIDEO व्हायरल

आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत दाटीवाटीच्या घरांमुळे हा विषाणू वेगाने पसरतो आहे. मार्चच्या शेवटी धारावीत पहिला रुग्ण सापडल्याची बातमी आली होती. आता धारावीत 14 कोरोनारुग्ण आहेत. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 10 भागांमध्ये भाजीविक्रीसुद्धा बंद आहे. ये-जा करणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

धारावीतल्या साडेसात लाख लोकांचं होणार स्क्रीनिंग

ही लागण वेळीच रोखण्यासाठी आणि परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून मुंबई महानगरपालिका स्पेशल प्लान तयार करत आहे.

या प्लानबाबत मुंबई महापालिकेचे अधिकारी, खासदार राहुल शेवाळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानुसार ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन दीडशे डॉक्टर देणार आहे. त्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे.

यात 2 खाजगी डॉक्टरांबरोबर दोन बीएमसी चे डॉक्टर आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची एक टीम तयार केली जाणार आहे. अशा टीम्स तयार करून त्या 10 दिवसांमध्ये धारावीतल्या साडेसात लाख रहिवाशांचं स्क्रिनिंग करणार आहेत.

अन्य बातम्या

बोटीवर कोरोनाग्रस्त आहे समजताच थेट समुद्रात मारल्या उड्या, VIDEO VIRAL

धारावीत कोरोनाचा तिसरा बळी; मुंबईचा सगळ्यात धोकादायक हॉटस्पॉट

लॉकडाऊन हटवताच चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा भडका, एका दिवसात 63 कोरोना पॉझिटिव्ह

First published: April 9, 2020, 7:46 PM IST

ताज्या बातम्या