BREAKING: मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, उपचारादरम्यान झालं निधन

BREAKING: मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, उपचारादरम्यान झालं निधन

शिरीष दीक्षित यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते.

  • Share this:

मुंबई, 9 जून: मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाची लागण झाल्यानं मुंबई महापालिकेचे विशेष प्रकल्पाचे प्रभारी उपायुक्त शिरीष दीक्षित यांचं निधन झालं. शिरीष दीक्षित यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी दीक्षित यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरीष दीक्षित महापालिकेच्या विशेष पाणीपुरवठा प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता होते.

हेही वाचा..  15 ऑगस्टनंतरही शाळा सुरू होणार की नाही, केंद्र सरकारनं केला मोठा खुलासा

कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा संरक्षण

कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात कार्यरत असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा या साथकाळात कार्यरत असताना मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान साहाय्य येणार आहेत. फक्त आरोग्य सेवेतच नाही तर पालिकेच्या सर्वच कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. फक्त परमनंट नव्हे तर काँट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ही मदत देण्यात येईल.

नियमित कामगार/कर्मचारी यांच्यासह कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही मृत्यू झाला तर असं सहाय्य मिळणार आहे.

Covid 19 च्या साथीदरम्यान सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा विमा लागू होईल. दिनांक 1 मार्च ते 30 सप्टेंबर 2020 कालावधीसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचा 50 लाखांचा विमा उतरवणारी ही देशातली पहिली महापालिका असल्याचा मुंबई महापालिकेचा दावा आहे.

हेही वाचा.. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रामू आणि बसंती निघाले सुसाट, पाहा CUTE VIDEO

कोरोनामुळे शिवसेना नगरसेवकाचं निधन...

दुसरीकडे, मीरा भाईंदरमधील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचं मंगळवारी कोरोनामुळे ठाण्याच्या वेदांत रुगणालयात निधन झालं.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. आमदार सरनाईक यांनी हरिशचंद्र आमगावरकर यांन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आठवड्यापूर्वी नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये त्यांच्या पत्नीला डीचार्ज देण्यात आला होता तर भाऊ आणि आई या सध्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

हरिशचंद्र आमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकेतमध्ये दोन टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते, तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख होती. याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडीयावर कोरोनामुळे हरिशचंद्र आमगावकर यांचं निधन झाल्याचे नमूद करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

First published: June 9, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या