• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंबईकरांनो सावधान! नियम पाळाच, कारण महापालिकेने मोडले आहेत कारवाईचे सर्व रेकॉर्ड

मुंबईकरांनो सावधान! नियम पाळाच, कारण महापालिकेने मोडले आहेत कारवाईचे सर्व रेकॉर्ड

Mumbai: A view of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) building lit-up in Tricolour ahead of the Independence Day in Mumbai, Tuesday, Aug 13, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI8_13_2019_000221B)

Mumbai: A view of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) building lit-up in Tricolour ahead of the Independence Day in Mumbai, Tuesday, Aug 13, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI8_13_2019_000221B)

नागरिकांकडून एका दिवसांत 27 लाख 18 हजार 792 रुपयांची मुंबई महापालिकेने दंड वसुली केली.

  • Share this:
मुंबई, 20 फेब्रुवारी : मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाईला सुरुवात करताच शुक्रवारी 19 फेब्रुवारीला एक दिवसात 13 हजार 592 लोकांवर कारवाई करण्यात आली. मुंबईत मास्क न लावून फिरणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशा नागरिकांकडून एका दिवसांत 27 लाख 18 हजार 792 रुपयांची मुंबई महापालिकेने दंड वसुली केली. सगळ्यात जास्त कारवाई ही मुंबईच्या पश्चिम उपनगरात झाली आहे. अंधेरी पश्चिममध्ये 1253 जणांवर कारवाई करण्यात आली. तर अंधेरी पूर्वेला विनामाक फिरणाऱ्या 918 जणांना क्लीनअप मार्शलने पकडून दंड वसूल केला. तर मुंबईच्या पूर्व उपनगरातील कुर्ल्यात 902 जणांविरोधात एस वॉर्ड म्हणजेच भांडुपमध्ये 717 विनामास्क फिरणारे कारवाईच्या जाळ्यात सापडले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी रात्री महापालिकेने परिपत्रक काढून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई अधिक कडक करणार असल्याचे घोषित केले. आता त्यासाठी अधिकच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मुंबईच्या मध्य, पश्चिम, आणि हार्बर रेल्वे मार्गावरही प्रत्येकी 100 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना ट्रेनमधून विनातिकीट फिरण्याची मुभा देण्यात आली आहे, जेणेकरून कारवाई करणं सोपं होईल. हेही वाचा - मुंबई पोलिसांना मोठं यश, कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळाला! मुंबई शहरात 25 हजार जणांवर प्रत्येक दिवशी कारवाईचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे. त्यासाठी याआधी 2400 इतके असणाऱ्या क्लीन अप मार्शलची संख्या वाढवून ती 4800 इतकी करण्यात आली आहे. करोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मास्क घालणं, हात स्वच्छ धुणं आणि सुरक्षित अंतर बाळगणं या त्रिसूत्रीची गरज आहे हे घोषित केल्यानंतर मुंबईत मागच्या वर्षीच्या म्हणजेच 2020 च्या एप्रिल महिन्यापासूनच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई मनपाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2020 ते 19 फेब्रुवारी 2021 पर्यंत एकूण 15 लाख 71 हजार 679 विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याद्वारे 31 कोटी 79 लाख 43 हजार 400 रुपयांची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. सगळ्यात जास्त कारवाई मुंबईच्या पश्चिम उपनागरातील अंधेरी पश्चिममध्ये करण्यात आली, ज्यात 1 लाख 13 हजार 195 जणांना प्रत्येकी 200 रुपये दंड ठोठावला गेला. त्याखालोखाल अंधेरी पूर्वेत 98 हजार 695 जणांवर तर पूर्व उपनगरांतील भांडुपमध्ये 87 हजार 269 जण, कुर्ल्यात 86 हजार 614 तर कांदिवलीत 77 हजार 258 जणांवर कारवाई करणयात आली . विनामास्क फिरणारे म्हणजे ज्यांच्याकडे मास्क नाही असेच नाही तर मास्क आहे पण हनुवटीखाली ज्यांनी मास्क ओढला आहे अशांवरही 200 रुपये दंड म्हणून मुंबई मनपा वसूल करत आहे. त्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आणि दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी तुम्हाला मास्क वापरण्याशिवाय पर्याय नाही, हेच महापालिकेला आपल्या कारवाईतून सांगायचं असावं.
Published by:Akshay Shitole
First published: